आधी नवऱ्याला दारू पाजली, नंतर त्याचाच काटा काढला, तिने असं का केलं ?

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा महिलेने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना दापोलीत घडली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली. तिने असं नेमकं का केलं ? सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी उकललं बेपत्ता इसमाच्या हत्येचं गूढ

आधी नवऱ्याला दारू पाजली, नंतर त्याचाच काटा काढला, तिने असं का केलं ?
दापोली क्राईम
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 2:26 PM

लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या इसमावर प्रेम होतं आणि त्याच प्रेम संबंधांमध्ये अडसर ठरतो, म्हणून महिलेने स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं आणि नवऱ्याचा काटा काढला. दापोलीमध्ये भयानक हत्याकांड घडलं असून अनैतिक संबंधातून निर्घृण कृत्य करणारी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नेहा बक्कर आणि मंगेश चिंचघरकर अशी आरोपींची नावे असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे . तर निलेश बक्कर असे मृत इसमाचे नाव आहे.या घटनेने दापोलीमध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत निलेश बाक्कर यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिम्हवणे गावात सलूनचा व्यवसाय होता. मात्र ते सोमवारी अचानक बेपत्ता झाले, त्यानंतर त्यांच्या भावाने दापोली पोलीस स्थानकात जाऊन आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार दापोली पोलिसांनी तपास करताना पोलिसांनी बेपत्ता निलेश यांच्या पत्नीकडे, नेहाकडेही चौकशी केली, मात्र तिच्या सांगण्यात तफावत आढळून आली. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी नेहा ज्या हॉटेलमध्ये काम करत होती, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा नेहा आणि तिचा पती हे दोघे हॉटेलमधून एकत्र बाहेर पडत असल्याचे दिसून आले, त्यामुळे पोलिसांता संशय आणखीनच बळावला. तसेच नेहा हिने एका बिअर शॉपमधून बिअर घेतल्याचे सुद्धा सीसीटीव्ही मध्ये दिसून आले.

अखेर पोलिसांनी नेहाला ताब्यात घेऊन तिची कठोरपणे चौकशी केली असता तिने तिचा गुन्हा कबूल केला. प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा आपल्याच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे तिने सांगितलं. आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली आणि त्याचा खून केला, त्यानंतर तो मृतदेह विहिरीत फेकला असं तिने कबूल केलं. पोलिसांनी नेहाचा प्रियकर संशयित आरोपी मंगेशलाही अटक केली आहे. तो बस चालक आहे. मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले . तर निलेश याचा मृततेह विहीरीतून काढून दापोली रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आला. या भयानक हत्याकांडाने दापोलीवासीय प्रचंड घाबरले असून गावात खळबळीचे वातावरण आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.