बारमेर : राजस्थनच्या बारमेर जिल्ह्यातील चौहान पोलीस स्टेशन परिसरातून 3 जणांचा मृत्यू (3 people died) झाल्याची माहिती समोर आली आहे. सासरच्या व माहेरच्या मंडळींच्या परस्पर वादातून मयत महिलने दोन लहान मुलांसह स्वत:चेही (woman killed children and herself) आयुष्य संपवले आहे. तिने प्रथम दोन मुलांचा जीव घेतला आणि त्यानंतर स्वत: आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेच्या बहिणीचे अवघ्या पाच दिवसांनी लग्न होणार होते.
बहिणीच्या लग्नासाठीच तिला तिच्या माहेरच्या घरी जायचे होते, पण याला त्या महिलेचा नवरा आणि सासरच्यांचा विरोध होता. यामुळे संतापलेल्या महिलेने हे भयानक पाऊल उचलले. दोन निष्पाप मुले आणि आईचा मृत्यू झाल्याची बातमी पसरल्याने परिसरात खळबळ उडाली.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारमेर जिल्ह्यातील चौहटन पोलीस स्टेशन हद्दीतील लिलसर गावातील रहिवासी असलेल्या सत्तारामचा विवाह झांफली गावातील सोनी देवी यांच्याशी 12 वर्षांपूर्वी झाला होता, मात्र काही काळानंतर त्या दोघांच्या कुटुंबियांमध्ये (सासरचे व माहेरचे लोक यांच्यामध्ये) वाद झाला. सत्तारामच्या एका भावाचा आणि बहिणीचा विवाह सोनीदेवीच्या बहिण-भावाशी झाला होता.
माहेरी जाण्यास होता विरोध
लग्नानंतर लगेचच काही कारणामुळे दोन्ही कुटुंबात कडाक्याचं वाद झाला आणि नातं तुटलं. त्यांचं भांडण आणि तुटलेलं नातं, यामुळे त्यांचं एकमेकांच्या घरी येणे-जाणेही बंद झाले. सोनीदेवी यांना मुले झाल्यानंतर ती सासरच्या घरी राहू लागली. ती क्वचितच माहेरी जात असेल, मात्र ते तिच्या सासरच्या मंडळींना पसंत नव्हते. या कारणावरून त्यांचे सासरच्या मंडळींशी खूप वाद होत होते.
बहिणीच्या लग्नासाठी माहेरी जायची होती इच्छा
या दरम्यान सोनीदेवी हिच्या बहिणीचे लग्न ठरले होते व तिला तिच्या बहिणीच्या लग्नासाठी माहेरी जायचे होते. मात्र पती सत्ताराम व त्याचे कुटुंबीय या गोष्टीवर नाराज असल्याने त्यांच्यात वाद झाला, तो इतका वाढला की, सोनीदेवीने आपल्या दोन निष्पाप मुलांची हत्या केली आणि स्वतःलाही पेटवून घेतले. त्यामुळे गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णांलयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही मृतदेह बाडमेर रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. यासोबतच पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांनाही माहिती दिली आहे.