तो लुट गए … महिलेनेच केली प्रियकराची फसवणूक, मारहाणीनंतर विवस्त्रावस्थेत हायवेवर सोडलं; कुठे घडलं हे ?

एका महिलेने तिच्या मित्रांसोबत कट रचून आपल्याच प्रियकराला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर त्याला बेदम मारहाणही करण्यात आली. महाराष्ट्रातील या संतापजनक प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

तो लुट गए ... महिलेनेच केली प्रियकराची फसवणूक, मारहाणीनंतर विवस्त्रावस्थेत हायवेवर सोडलं;  कुठे घडलं हे ?
जमिनीच्या वादातून मुलाने बापाला संपवले
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 4:40 PM

ठाणे : एका 30 वर्षीय महिलेने इतर चार जणांसह मिळून तिच्या प्रियकराला (woman loots boyfriend) लुटले आणि त्याला मारहाण (beat him up) करून हायवेवर नग्नावस्थेत फेकून दिल्याची धक्कादयक घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे हा खळबळजनक प्रकार घडला असून त्या इसमाचे लाखो रुपये लुटण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्या आरोपींपैकी दोघांची ओळख पटली असून भाविका भोईर असे महिलेचे आणि नदीम खान असे एका आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवभगत असे पीडित इसमाचे नाव असून तो व्यावसायित आहे. गेल्या काही वर्षांपासून बालाजी आणि भाविका हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते, असे समजते.

त्या संध्याकाळी काय झालं ?

28 जून रोजी भाविका भोईर हिने बालाजी यांना दुपारी 4.30 च्या सुमारास शहापूरजवळील अटगाव येथील हायवेवर एका ठिकाणी भेटण्यास बोलावले. ते दोघे एकमेकांशी बोलत असताना भाविकाचे चार साथीदार आले आणि त्यांनी बालाजी यांच्याकडील सर्व माल हस्तगत केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बालाजी यांना बेदम मारहाण करण्यात आली व पहाटेच्या सुमारासा त्यांना विवस्त्रावस्थेत हायवेवर फेकून देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालाजी शिवभगत यांच्यावर रुग्णालयात २-३ दिवस उपचार सुरू होते. ते आता कसेबसे या धक्क्यातून सावरत आहेत. ” मी तिच्यासाठी सगळं काही केलं. तिची इच्छा होती म्हणून छोटं घरं बांधलं, वेळेवोळी तिला विविध वस्तू विकत घेऊन दिल्या. तिचा कोणताही शब्द खाली पडू दिला नाही. पण तिने केवळ दुसऱ्या माणसासाठी मला फसवलं , एवढंच नाही तर माझ्यावर क्रूर हल्लाही केला.”

28 जून रोजी भाविका भोईरने बालाजी यांना भेटायला बोलावले, तेव्हा काही वस्तूही मागवल्या होत्या. त्यामध्ये साडी, सोन्याचे कानातले, सोन्याचे पैंजण आणि बांगड्या, नवीन पावसाळी चपला आणि छत्री यांचा समावेश होता. ” मी या सर्व भेटवस्तू घेऊन हायवेवर पोचलो, ती माझ्या क्रेटा कारमध्ये बसली आणि सगळ्या वस्तू ताब्यात घेतल्या. अचानक चार अनोळखी माणसं कारमध्ये घुसली आणि मला बाजूला ढकलले आणि चॉपरने माझ्यावर वारही केले. त्यापैकी एकाने गाडी चालवायला सुरुवात केली ” असे बालाजी शिवभगत म्हणाले.

त्यानंतर शिवभगत यांना हॉटेलमध्ये नेऊन सकाळपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्यांचे कपडे उतरवून काही व्हिडीओही शूट करण्यात आले. त्यांच्या हातातील सोन्याच्या सात अंगठ्या, दोन चेन खेचल्या आणि बालाजी यांच्या डोळ्यात लाल तिखट टाकून त्यांना पहाटे पाच वाजता हायवेवक फेकून देण्यात आले असे पोलिसांनी सांगितले. बालाजी यांनी कसेबस पोलिस स्टेशन गाठत घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी मित्रांना बोलावले, ज्यांनी बालाजी यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.