नोकरीचं आमिष दाखवून अनेकवेळा अत्याचार, नंतर ३६ तुकडे करण्याची धमकी…. पीडितेने सांगितली आपबीती !
एका सरकारी कर्मचाऱ्याने नोकरी देण्याचे आमिष दाखवत महिलेशी मैत्री केली व नंतर तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
जयपूर : राजस्थानच्या मध्ये एका महिलेने सरकारी कर्मचाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. एवढेच नव्हे तर त्याने आपल्याकडून दीड लाख रुपये घेतल्याचेही तिने (crime news) नमूद केले. मात्र त्याचं खरं रुप आल्यावर तिने पैसे मागितले आणि पोलिसांत जाईन असे सांगितले असता, त्याने तिने ३६ तुकडे करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राजस्थानमधील धौलपूरमध्ये पीडित महिलेने सरकारी कर्मचाऱ्यावर हे आरोप केले आहे. नोकरीचे आमिष दाखवत त्याने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खरंतर, धौलपूर जिल्ह्यातील बाडी येथे राहणारी ही महिला ३० वर्षांची असून तीन-चार वर्षांपूर्वी तिचे पतीश भांडण झाले होते. त्यानंतर ती तिच्या दोन मुलांना घेऊन माहेरी परतली. तेथे ती विविध ठिकाणी घरकाम करत उदरनिर्वाह करत होती. त्याचदरम्यान आरोपी सुरेंद्र याच्याशी तिची ओळख झाली व त्यांची मैत्री वाढली. सुरेंद्र हा सरकारी अधिकारी असल्याचे समजते.
नोकरीचे आमिष दाखवून केले शोषण
त्याने हळहळू पीडित महिलेची मदत करत तिचा विश्वास संपादन केला. त्या दोघांदरम्यान जवळीक वाढू लागली. सरकारी नोकरीचे आमिष दाखवत आरोपीने गेल्या काही वर्षांत आपले अनेक वेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला. एवढेच नव्हे तर त्याने आपल्याकडून 1 लाख 65 हजार रुपयेही उकळल्याचेही महिलेने तक्रारीत नमूद केले.
एवढे करूनही नोकरी काही मिळाली नाही. त्यानंतर महिलेला त्याचे खरे रुप समजले असता, तिने त्याच्याकडे पैसे परत मागितले असता आरोपीने त्या महिलेला धमकी दिली.
पोलिसांकडे गेल्यास 36 तुकडे करेन
याप्रकरणाची कुठेही वाच्यता केलीस किंवा पोलिसांत गेलीस तर मी तुझे 36 तुकडे करेन अशी धमकी आरोपीने पीडित महिलेला दिली असे तिने नमूद केले. मात्र त्यानंतरही त्या महिलेने तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे ठरवले आणि ती पोलिसांकडे पोहोचली. तिने आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.