पॉलिथिन बॅगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, पोलीस तपासात गुंतले, नंतर म्हणाले…
पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे तपासणीसाठी पाठवले अजून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तपास करण्यासाठी अधिक मदत होईल
दिल्ली : दिल्लीतील (delhi) सराय काले खां परिसरात एका महिलेचा मृतदेह पॉलिथिन बॅगमध्ये (polythene bag)सापडल्यामुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. पोलिस त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत. आतापर्यंत ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्यावेळी त्या महिलेची हत्या करण्यात आली, त्यावेळी तिच्या शरिराचे तुकडे करण्यात आले आहेत. त्यानंतर मृतदेहाची (deadbody) विल्हेवाट लावण्यासाठी पॉलिथिन बॅगमध्ये ते तुकडे भरुन फेकून देण्यात आले आहेत. ज्यावेळी त्या परिसरात दुर्गंधी पसरली त्यावेळी तिथल्या लोकांनी या प्रकरणाची कल्पना पोलीसांनी दिली. सराय काले खां परिसरात बस स्टँडशेजारी मृतदेह सापडला आहे.
सन लाइट कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये दुपारी या घटनेची माहिती मिळाली. ज्यावेळी पोलिसांनी पॉलिथिन बॅग उघडली त्यावेळी पोलिस काही घाबरले. पॉलिथिन बॅगच्या पिशवीत महिलेच्या शरिराचे काही तुकडे मिळाले. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. परंतु अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीचं गोष्ट लागली नसल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिस विविध पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. तिथल्या परिसरातील सीसीटिव्ही तपासण्याचं काम सध्या पोलिसांनी सुरु केलं आहे. त्याचबरोबर त्या परिसरातील मृतदेह असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विविध पथक तयार केली आहेत.
पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे तपासणीसाठी पाठवले अजून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तपास करण्यासाठी अधिक मदत होईल