इमारतीच्या नवव्या मजल्यावरील बांबूचे मचान काढत होता, अचानक तोल गेला अन्…

काशिमीरा परिसरात एका टॉवरच्या बांधकामाचे काम सुरु होते. यावेळी इमारतीच्या छताला आधार देण्यासाठी बांधलेले बांबूचे मचान काढताना कामगाराचा तोल गेला.

इमारतीच्या नवव्या मजल्यावरील बांबूचे मचान काढत होता, अचानक तोल गेला अन्...
इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 10:50 PM

मीरा भाईंदर : निर्माणाधीन इमारतीच्या स्लॅबचे बांबूचे मचान काढताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मीरा रोड येथे घडली. काशिमिरा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. एका 47 वर्षीय मजुराचा बांधकाम सुरू असलेल्या उंच इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. बांधकाम कंपनीशी संलग्न बिल्डर, कंत्राटदार आणि साईट पर्यवेक्षकासह तीन जणांवर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेतीन वाजता कृष्णा प्रेस्टीज- काशिमिरा येथे बांधण्यात येत असलेल्या उंच टॉवरमध्ये ही दुर्घटना घडली.

नवव्या मजल्यावरुन तोल जाऊन कोसळला

प्रेमचंद हरगणे राम असे मयत कामगाराचे नाव आहे. प्रेमचंद मिस्त्री म्हणून काम करत होता. सिमेंट काँक्रीटच्या छताच्या स्लॅबला आधार देण्यासाठी वापरण्यात आलेले बांबूचे मचान काढताना तोल गेला आणि तो नवव्या मजल्यावरून जमिनीवर कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बिल्डर, कंत्राटदार आणि साईट पर्यवेक्षकाविरोधात गुन्हा दाखल

मृत व्यक्तीने उंचावर काम करणाऱ्या प्रत्येक मजुरासाठी अनिवार्य असलेला सेफ्टी बेल्ट घातला नव्हता. तसेच तो ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी सुरक्षा जाळ्याही नव्हत्या, असा आरोप आहे. पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि साईट पर्यवेक्षक यांच्याविरुद्ध कलम 304 (अ) अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. निखिल मुळू मंडल साइट पर्यवेक्षकाचे नाव असून, तो नालासोपारा येथील रहिवासी आहे.

हे सुद्धा वाचा

बिल्डर आणि कंत्राटदाराची नावे तपासण्यासाठी इमारतीची कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया सुरू होती, तपास अधिकारी पीएसआय देशमुख यांनी सांगितले. उच्चभ्रू इमारतींवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत बांधकाम व्यावसायिकांचा घोर निष्काळजीपणा आणि उदासीन वृत्ती या घटनेने पुन्हा एकदा समोर आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.