Worli Hit & Run Case : महिलेला चिरडणाऱ्या मिहीर शाहचा आणखी एक कारनामा, ओळख पटू नये म्हणून …

मुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहच्या गाडीखाी चिरडून कावेरी नाखवा या महिलेच मृत्यू झाला. या घटनेनंतर फरार झालेल्या मिहीरला तब्बल २ दिवसांनी पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा त्याला आजपर्यंत (१६ जुलै) पोलिस कोठडी ठोठावण्यात आली होती. त्याच्या कोठडीची मुदत आज संपणार असल्याने वरळी पोलीस आज त्याला पुन्हा […]

Worli Hit & Run Case : महिलेला चिरडणाऱ्या मिहीर शाहचा आणखी एक कारनामा, ओळख पटू नये म्हणून  ...
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 8:28 AM

मुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहच्या गाडीखाी चिरडून कावेरी नाखवा या महिलेच मृत्यू झाला. या घटनेनंतर फरार झालेल्या मिहीरला तब्बल २ दिवसांनी पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा त्याला आजपर्यंत (१६ जुलै) पोलिस कोठडी ठोठावण्यात आली होती. त्याच्या कोठडीची मुदत आज संपणार असल्याने वरळी पोलीस आज त्याला पुन्हा कोर्टात हजर करणार असून त्याच्या वाढीव कोठडीची पोलिसांकडून मागणी करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात आत्तापर्यंत काय-काय कारवाई झाली, काय तपास करण्यात आला याचा लेखाजोगाही पोलीस कोर्टात सादर करणार आहेत.

या हिट अँड रन प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांसमोर आणखी एक महत्वाची माहिती उघड झाली आहे. शिवसेना शिंदेगटाचे (माजी) उपनेते राजेश साह यांचा मुलगा आणि या घटनेतील मुख्य आरोपी असलेला मिहीर शाह याला दारूचे व्यसन असून तो नियमित दारू प्यायचा. दारूच्या व्यसनामुळे त्याला हेही माहीत होतं की एक ठराविक वेळेनंतरही दारू कुठे मिळते, त्याची त्याला पूर्ण कल्पना होती, असे त्याने स्वत:च चौकशीत सांगितले.

एवढेच नव्हे तर रविवारी पहाटे हा अपघात होण्यापूर्वी मिहीर व त्याचे मित्र जुहूमधील बारमध्ये पार्टी करत होते. त्याच बारमध्ये त्यांनी व्हिस्कीचे 12पेग रिचवल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या 4 तास आधी मिहीर शहा आणि मित्रांनी विस्कीचे 12 पेग प्यायल्याची माहिती उघड झाली आहे. मात्र आरोपी मिहीर शाह याला 25 वर्षे पूर्ण झालेली नसतानाही त्याला व्हिस्की देण्यात आली होती, म्हणूनच या बारवर कारवाई करण्यात आली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर काल मुंबई महानगरपालिकेने बारवर तोडक कारवाई केली.

हे सुद्धा वाचा

अपघातानंतर फरार, ओळख पटू नये म्हणून…

एवढेच नव्हे रविवारी पहाटे हा अपघात घडल्यानतर कावेरी याना चिरडून, रस्त्यावर तशाच जखमी अवस्थेत सोडून तो पळून गेला. वडिलांशी संपर्क साधून तो फरार झाला. त्यानंतर तो लपण्यासाठी ठिकाण शोधत होता. या अपघाताप्रकरणी पोलिस त्याचा कसून शोध घेत होते तेव्हा आपली ओळख पटू नये म्हणून तो विरारमधील एका सलूनमध्ये गेला आणि तेथे त्याने स्वत:ची दाढी काढली आणि डोक्याचे केसूही कापन टाकले. लूक पूर्णपणे बदलावा आणि कोणालाच आपली ओळख पटू नये म्हणून त्याचा हा खटाटोप होता. आरोपी मिहीरचे केस ज्याने कापवे त्या सलूनवाल्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.

भरधाव कार चालविल्याने कापले चलन

वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहाने गुन्ह्यात वापरलेल्या कारबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मिहीरने गुन्ह्यांत वापरलेल्या कारवर या आधीही पोलिसांनी दोनवेळा कार भरधाव वेगात चालवल्या प्रकरणी चलन कापल्याचे समोर आले आहे. 23 फेब्रुवारी रोजी खालापूर टोल नाक्याजवळील सीसीटीव्हीत ही कार भरधाव वेगातने जात असल्याचे कैद झाले आहे. यावेळी त्या मार्गावरील वेग मर्यादा ही 100 असताना, गाडीचा वेग मात्र ताशी 111 किमी इतका होता. त्यावर महाराष्ट्र पोलिसांनी 2 हजारांचं चलन कापले होते.

तर 7 नोव्हेंबर 2023 रोजी पनवेल येथील टोल नाक्यावर 80 किमीची वेगमर्यादा असताना. गाडीचा वेग मात्र 88 किमी इतका होता. त्यानुसार गाडीवर 2000 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. या शिवाय त्या गाडीवर धोकादायक परिस्थितीत गाडी रस्त्यावर उभी केल्याप्रकरणी 500रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.