सराफा व्यापाऱ्याच्या घरी सावकारी पथकाची धाड, संशयास्पद कागद पत्रं ताब्यात घेतल्यामुळे…

या प्रकरणी उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशी सुरू असून चौकशी अंती सावकारी अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती नानासाहेब चव्हाण निबंधक यांनी दिली आहे.

सराफा व्यापाऱ्याच्या घरी सावकारी पथकाची धाड, संशयास्पद कागद पत्रं ताब्यात घेतल्यामुळे...
YAVATMALImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 9:51 AM

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) शहरातील एका सराफा व्यापाऱ्याच्या घरी सावकारी पथकाने (The lender team) धाड टाकून आक्षेपार्ह कागद पत्र जप्त केली. या कारवाईमुळे शहरातील अवैध सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी कागद पत्र पडताळणी नंतर महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार कारवाई (Proceedings under the Maharashtra Moneylending Act) करण्यात येणार आहे. गिरीश चंद्रकांत सुराणा असं कारवाई केलेल्या सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. आणखी काही ठिकाणी धाडी टाकण्यात येणार असल्याची सुध्दा माहिती मिळाली आहे. त्यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

अमरावती येथील राहुल श्रीधर राऊत यांनी सुराणा यांच्या शुभ लाभ ज्वेलर्स मधून साडेसहा लाख रुपयांचे दागिने खरेदी केले. त्या बदल्यात राऊत यांनी सुराणा यांना पुणे जिल्ह्याच्या जूनेगाव येथील 11 गुंठे जमिनीचे सौदे पत्र तयार करून दिले. त्यानंतर काही दिवसांनी राहुल श्रीधर राऊत यांनी सुराणा यांना दागिन्यांची संपूर्ण रक्कम परत केली. मात्र सुराणा यांनी अधिकच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार राऊत यांनी यवतमाळ जिल्हा उपनिबंधकयांचे कडे केली.

हे सुद्धा वाचा

त्यावरून उपनिबंधक यांनी पोलीस आणि महसूल विभागाच्या सहमतीने सुराणा यांच्या घरी धाड टाकली. या कारवाई दरम्यान सुराणा यांचे घरून आणि शुभ लाभ ज्वेलर्स मधून संशयास्पद कोरा चेक, खरेदी खत, बाँड पेपर, डायरी , पिवळ्या धातूच्या वस्तूसह महत्त्वाची 75 कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशी सुरू असून चौकशी अंती सावकारी अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती नानासाहेब चव्हाण निबंधक यांनी दिली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.