बंगळुरुच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष, यवतमाळला नेऊन अत्याचार, विवाहित भामट्याला बेड्या

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील दत्ता हिरामण राठोड नावाच्या विवाहित भामट्याने कर्नाटक राज्यातील बंगळुरु येथील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे बोलावले.

बंगळुरुच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष, यवतमाळला नेऊन अत्याचार, विवाहित भामट्याला बेड्या
अल्पवयीन मुलीची फसवणूक, भामट्याला अटक
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 11:31 AM

यवतमाळ : समाज माध्यमांचा दुरुपयोग करुन नांदेडमधील विवाहित व्यक्तीने बंगळुरुच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला यवतमाळला नेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून आरोपी त्यांना देहविक्रीच्या रॅकेटमध्ये ओढत असल्याची बाब समोर आली आहे

नेमकं काय घडलं?

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील दत्ता हिरामण राठोड नावाच्या विवाहित भामट्याने कर्नाटक राज्यातील बंगळुरु येथील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे बोलावले. मात्र माहूरमध्ये आपल्याला ओळखत असल्याने आरोपीने पीडित मुलीला यवतमाळमधील आर्णी येथील मारिया सलमान खान हिच्या घरी आणले.

गेल्या गुरुवारपासून ते दोघे मारियाच्या घरी एकाच खोलीत राहत होते. त्यामुळे आर्णी पोलिसांना संशय आला. त्यांनी दोघांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून विचारपूस केली. तेव्हा पीडित अल्पवयीन मुलीने सत्य परिस्थिती सांगितली. आर्णी पोलिसांनी बंगळुरु पोलिसांसोबत संपर्क करुन त्यांना माहिती दिली आणि आंतरराज्य टोळीचा छडा लावला.

लग्नाच्या आमिषाने मुलीला नांदेडला बोलावले

आरोपी दत्ताने फेसबुकवर फेक अकाऊण्ट तयार करुन बंगळुरु शहरातील 16 वर्षांच्या मुलीसोबत मैत्री केली. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, असे सांगून त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. पीडितेला त्याने बंगळुरुहून नागपूर मार्गे माहूरला बोलवले.

माहूरहून ते दोघे आर्णी येथील मारिया खान यांच्या घरी तीन दिवस एकाच खोलीत थांबले. दत्ता राठोड याने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडित अल्पवयीन मुलीने केला आहे. बंगळुरु शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुण अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना देहविक्रीच्या रॅकेटमध्ये ओढत असल्याची बाब पुढे आली आहे.

संबंधित बातम्या :

दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप

जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी साताऱ्यात तरुणाची हत्या, चांदीच्या तुटलेल्या चेनवरुन उलगडा

कॅटरर्स चालकाची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये तिघांची नावं

(Yawatmal Married Man arrested for luring minor girl from Bangalore on pretext of marriage)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.