महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो सांगत गंडा, आरोपीला कर्नाटकातून ठोकल्या बेड्या

फिर्यादी विद्यार्थ्याला 2019 मध्ये डी फार्मासाठी प्रवेश घ्यायचा होता. येवला येथील रहिवाशी जाकीर रफिक कुरेशी याने बंगळुरुतील तिवारी इंटरनॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे फिर्यादीला सांगितले.

महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो सांगत गंडा, आरोपीला कर्नाटकातून ठोकल्या बेड्या
येवल्यात कॉलेजमध्ये प्रवेश देतो सांगत फसवणूकImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 3:34 PM

नाशिक / उमेश पारीक (प्रतिनिधी) : येवला शहरातील जाकिर अब्दुल रहमान शहा या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अँडमिशन करून देतो असे सांगत पैसे उकळत फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुरशद अली उर्फ पाशा हसन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादीकडून आरोपीने 1 लाख 35 हजार रुपये उकळले होते. येवला पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेत मोठ्या शिताफीने सापळा रचत आरोपीला बंगळुरु शहरातून अटक केली आहे. अॅडमिशनच्या नावाखाली आरोपीने अजून कुणाची फसवणूक केली असल्यास येवला शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फिर्यादीला डी फार्मामासाठी प्रवेश घ्यायचा होता

फिर्यादी विद्यार्थ्याला 2019 मध्ये डी फार्मासाठी प्रवेश घ्यायचा होता. येवला येथील रहिवाशी जाकीर रफिक कुरेशी याने बंगळुरुतील तिवारी इंटरनॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे फिर्यादीला सांगितले. यानंतर जाकीर रफिक कुरेशी याने मुंबई येथील गुफारन खान मोहमद अली याच्याशी फिर्यादीची ओळख करून दिली.

प्रवेश मिळवून देतो सांगत पैसे उकळले

गुरफानने बंगळुरु येथील पाशा मुर्शाद आली हसन याच्याशी फिर्यादीचे फोनवर बोलणे करून दिले. मग प्रवेश मिळवून देण्यासाठी आधी 50 हजार रुपये रोख, मग फोन पे आणि गूगल पे वरुन 85 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर तुमचे अॅडमिशन झाले आहे सांगितले. मात्र परीक्षाच घेतली नाही.

हे सुद्धा वाचा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीची पोलीस ठाण्यात धाव

यानंतर लॉकडाऊनमध्ये तुम्ही पास झाले असेही सांगितले. फिर्यादीने आरोपींकडे परिक्षेचा निकाल मागितला असता त्यांनी निकाल अद्याप तयार नसल्याचे सांगितले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. याप्रकरणी फिर्यादीने ऑगस्ट 2022 मध्ये येवला पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली.

येवला पोलिसांकडून एका आरोपीला अटक

फिर्यादीच्या तक्रारीनुसार येवला पोलिसांनी पाच जणांविरोधात तक्रार दाखल करत तपास सुरु केला. प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी बंगळुरु येथील पाशा मुर्शाद आली हसन याला मोठ्या शिताफीने अटक केली. अन्य चार आरोपी फरार असून, पोलीस त्यांचाही कसून शोध घेत आहेत. येवला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.