काल वाढदिवस, आज खड्ड्यात पडून मृत्यू, दोन वर्षीय बालकाचा असाही शेवट
बराच वेळ झाल्यावर शौर्य दिसत नसल्याचं आईच्या लक्षात आलं. त्यानंतर शौर्यची शोधाशोध सुरू झाली.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली. दसरखेड येथील घरकुलाच्या बांधकामादरम्यान शौचालयासाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. या खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शौर्य गणेश इंगळे असं मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे. घराच्या अंगणात खेळत असताना शौर्य खड्ड्याजवळ गेला. खेळता खेळता खड्ड्यात पडला.
यावेळी आई घरकामात व्यस्त होती. वडील कामावर गेले होते. बराच वेळ झाल्यावर शौर्य दिसत नसल्याचं आईच्या लक्षात आलं. त्यानंतर शौर्यची शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. शौर्य याला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
लहान मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. ते एक वर्षाचे झाल्यावर चालू लागतात. तसाचं शौर्यही चालायला लागला. घराच्या आजूबाजूला खेळायचा. आईचं त्याच्यावर लक्ष असायचं. पण, आजचा दिवस त्याच्यासाठी शेवटचा ठरला.
घरकुलाचं बांधकाम करत असताना घरी शौचालय बनविण्याचे काम सुरू होते. त्यासाठी खड्डा खोदून ठेवला होता. खेळता खेळता शौर्य खड्डात पडला. तो केव्हा पडला हे कुणाच्याही लक्षात आहे नाही. बराच वेळ होऊन घरी न दिसल्यानं त्याची शोधाशोध सुरू झाली. तेव्हा शौचालयाच्या खड्ड्यात तो सापडला. रुग्णालयात नेले असता शौर्यचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.