Video : टवाळखोरांनी आईला छेडलं, मुलीने भर चौकात चोपलं… रणरागिणीच्या अवताराने सगळे अवाक् !

बेंचवर बसलेले काही टवाळखोर आईची छेड काढत असल्याचे पाहून त्या तरूणीचं डोकंच फिरलं. तिने रणरागिणीची अवतार धारण करत त्या चौघांना बेदम चोप दिला, जवळची खुर्ची उचलून त्यांना प्रसादच दिला. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Video : टवाळखोरांनी आईला छेडलं, मुलीने भर चौकात चोपलं... रणरागिणीच्या अवताराने सगळे अवाक् !
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 11:49 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींवरील, महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत. बदलापूरच्या शाळेत तर दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, तर मुंबईत एका नराधम पित्याने त्याच्याच 9 वर्षांच्या मुलीचे शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण आहे. मुलींच्या, महिलांच्या सुरक्षेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर महिला, युवतींना स्वसंरक्षणाची जबाबादारी घेतली पाहिजे, असे सांगत जनजागृती करण्यात येत आहे. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली. मात्र तेव्हा त्या तरूणीने शांत बसून अन्याय सहन न करता त्या नराधामांना चांगलाच धडा शिकवला. आईची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना एका तरूणीने बेदम चोप दिला, खुर्चीनेही हाणल्याची घटना नाशिकच्या पवन नगर परिसरात घडली आहे. तिचा हा रणरागिणीचा अवतार पाहून लोक थक्क झाले. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

छेड काढणाऱ्या चौघांना माय लेकीने दिला चोप

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पवन नगर परिसरातील हेडगेवार चौकात हा प्रकार घडला. काही टवाळखोर रस्त्यावरील बाकांवर बसून महिलांची, मुलींची छेड काढत होते. एक तरूणी व तिची आई रस्त्याने जात अस्ताना त्यांनी तिचीही छेड काढली. सुरुवातीला महिलेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्या तरूणांना आणखीनच चेव चढला आणि त्यांनी पुन्हा छेडछाड सुरू केली. टवाळखोर नराधम आईची छेड काढत असल्याचे पाहून त्या मुलीचं डोकंच फिरलं. त्यांनी भर रस्त्यातच त्यांना चांगलाच चोप दिला.

जाब विचारला अन्…

महिलेने त्या टवाळखोराला आधी जाब विचारला, पण त्याने अरेरावी करत हुज्जत घालण्यास सुरवात केली. यानंतर महिलेचा पारा चढला आणि महिलेने रणरागिणीचे रूप धारण करून त्याला चोप देण्यास सुरुवात केली. बाजूने एक भंगरवाल्याची गाडी जात होती, तिने त्या गाडीवरून एक खुर्ची उचलली आणि त्याचा प्रसाद देत अद्दल घडवली.

 

धाडसाचं होतंय कौतुक

त्या दोघींनी त्या तरूणांना बेदम चोप देत धडा शिकवला. हा संपूर्ण प्रकार त्या मार्गावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतोय. अन्याय सहन करता , छेड काढणाऱ्या अद्दल घडवणाऱ्या , त्या रणरागिणींच्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. छेड काढणाऱ्या त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.