कॉलेजला गेलेली 17 वर्षीय मुलगी परतलीच नाही, अपहरणाची तक्रार, आई-वडिलांच्या पोलिसात चकरा
लग्नाचे आमिष एका 17 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. (Young Girl kidnapped in Buldhana)
बुलडाणा : लग्नाचे आमिष एका 17 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलडाण्यातील शेगावमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मुलीला परत मिळवण्यासाठी तिचे आई-वडिल पोलिसात चकरा मारत आहेत. मात्र याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. (Young Girl kidnapped in Buldhana Shegaon)
लग्नाचे आमिष दाखवून अपहरण
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील संगम नगर भागात राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. ही तरुणी कॉलेजला गेलेली असताना तिचे अपहरण करण्यात आले. या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला आहे. शेजारी राहणाऱ्या नागेश गावंड या तरुणाने अपहरण तिचे अपहरण केले असावे, असा दावाही तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
दरम्यान याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी शेगाव शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शेगाव शहर पोलिसात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश गावंडे असे यातील आरोपीचे नाव आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे.
आठ दिवस उलटूनही तरुणीचा पत्ता नाही
मात्र घटनेला 8 दिवसांचा कालावधी उलटला आहे. अपहरण झालेली तरुणी अद्यापही परत न मिळाल्याने तिचे आईवडील दररोज पोलीस स्टेशनला चकरा मारत आहेत. तर दुसरीकडे पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत. (Young Girl kidnapped in Buldhana Shegaon)
Paytm चा लाखो ग्राहकांना इशारा! नवे डेबिट कार्ड मिळाल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…#PaytmPaymentsBank #DebitCard #DebitCardfraud #paytmkaro https://t.co/Qgk6DNg1aV
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत जबरी घरफोडी, ऐरोलीत घराचे दोन कुलूप उचकटून 4 लाखांचं सोनं लंपास
प्रेयसीचं लग्न ठरल्याने नाराजी, नायर रुग्णालयातील 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकललं