
भोपाळ : मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात समोर आला असून, तंत्रज्ञानाच्या सुविधेमुळे एका अल्पवयीन मुलीचा जीव (saved life) वाचला. फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट (video on social media) करण्यात आला होता, ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी आत्महत्येच्या तयारीत होती. अमेरिकेतील मेटा फेसबुक टीमला याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि तिचे लोकेशन ट्रेस केले. तिचे स्थान मध्य प्रदेशात सापडले. त्यांनी तत्काळ भोपाल येथील सायबर पोलिसांना ही गोष्ट कळवली. त्यानंतर पुढील कारवाई करून मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्हा पोलिसांना कळवले आणि घटनास्थळी पोहोचून मुलीला वाचवले.
छोट्याशा गोष्टीमुळे रागावलेल्या तरूणीने घेतला होता आयुष्य संपवण्याचा निर्णय
सिंगरौली येथील रहिवासी असलेल्या तरुणीच्या लाइव्ह आत्महत्येच्या प्रयत्नाचा फोटो आणि व्हिडिओ रील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला जात असल्याची माहिती सायबर जबलपूरचे एसपी युसूफ कुरेशी यांच्यामार्फत मिळाली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक मो. युसूफ कुरेशी यांनी ताबडतोब संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याला सूचित केले व मुलीला तात्काळ पकडण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस अधीक्षक मोहम्मद. युसूफ कुरेशी यांनी पोलीस पथकाला सूचना देऊन मुलीच्या मोबाईल क्रमांकावर गांभीर्याने लक्ष ठेवून मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन मुलीशी बोलण्याचा व मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून लाईव्ह लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीचा फोन बंद येत होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीचे लोकेशन ट्रेस केले आणि तिला सोडवण्यासाठी घरी पोहोचले. पोलिस जेव्हा मुलीच्या घरी पोहोचले तेव्हा मुलीने पोलिसांना सांगितले की, आत्महत्येचा व्हिडिओ रील आणि फोटो कुटुंबीयांना घाबरवण्यासाठी पोस्ट केले होते, जे मी लगेच डिलीट केले.
रविवारी सकाळी पोस्ट केला होता व्हिडीओ
बैधान परिसरात राहणाऱ्या एका मुलीने रविवारी सकाळी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये मुलगी पांढऱ्या स्कार्फने गळफास लावून जीव देण्याचा प्रयत्न करत असल्याचे होते.
इन्स्टाग्रामवरून पोलिसांना मिळाली माहिती
व्हिडिओ अपलोड होताच इन्स्टाग्रामने सायबर जबलपूरच्या पोलिस अधीक्षकांना या व्हिडिओची माहिती दिली. सायबर पोलिसांतर्फत ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी ही माहिती मिळताच तातडीने कारवाई करत एक पथक तयार करून मुलीचा शोध घेतला.
तरूणीचे करण्यात आले काऊन्सिलिंग
या घटनेनंतर पोलीसांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुलीचे समुपदेशन केले. लोकेशनच्या आधारे पोलिसांचे पथक मुलीच्या घरी पोहोचले तेव्हा मुलगी घरात एकटीच होती. महिला पोलिस अधिकाऱ्यांनी तिला विचारले असता तिने सुरुवातीला व्हिडिओ पोस्ट केला नाही असे सांगितले आणि रडू लागली. जेव्हा पोलिसांनी तिला समजावून सांगितले आणि त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटची माहिती दिली तेव्हा तिने सांगितले की ती सध्या तिच्या मावशीच्या घरी आहे. मला घरी जायचे होते पण कुटुंबियांनी घरी येण्यास नकार दिला. त्यामुळे घरातील सदस्यांना घाबरवण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केला, जेणेकरून तिचे कुटुंबि तिला घरी घेऊन जातील. महिला पोलीसांनी तिला सजावत भविष्यात असे कोणतेही कृत्य करू नये, असा इशारा दिला.