Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! महिला सावकाराच्या जाचाला कंटाळून सांगलीत पोलीस स्टेशनमध्ये तरुणाची आत्महत्या

सांगलीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अतुल गरजे पाटील असे या तरुणाचे नाव आहे. अतुल हा शहर पोलीस ठाण्यात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता.

धक्कादायक! महिला सावकाराच्या जाचाला कंटाळून सांगलीत पोलीस स्टेशनमध्ये तरुणाची आत्महत्या
आत्महत्येच्या घटनेनं खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 1:34 PM

सांगली : सांगलीमधून (Sangli) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने पोलीस ठाण्यात आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. अतुल गरजे पाटील (Atul Garje Patil) असे या तरुणाचे नाव आहे. अतुल हा शहर पोलीस ठाण्यात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याने शहर पोलीस ठाण्याच्या टेरेसवर जाऊन, विषप्राशन करत आपले जीवन संपवले, या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. एका महिला सावकाराने कर्ज वसुलीसाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून अतुल याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणात आत्महत्येपूर्वी अतुल पाटील याने एक चिट्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी देखील पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीमध्ये संबंधित महिला सावकाराचा उल्लेख असून, वसुलीच्या तगाद्याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे या तरुणाने म्हटल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

सांगलीमध्ये राहणाऱ्या अतुल पाटील या तरुणाने आत्महत्या केली आहे. तो शहर पोलीस ठाण्यात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता.  त्याने पोलीस ठाण्याच्या टेरेसवर जाऊन, विषप्राशन केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान अतुल गरजे पाटील याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठ लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल गरजे याने त्या चिठ्ठीत एका महिला सावकाराचे नाव लिहेले आहे. कर्जाच्या वसुलीसाठी लावलेल्या तगाद्याला वैतागून आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे.  या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले.

शहरात खळबळ

अतुल गरजे पाटील याने सावकराने लावलेल्या वसुलीच्या तगाद्याला वैतागून आत्महत्या केली. त्याने विषप्राशन करून आपले जीवन संपवले या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अतुल गरजे यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा सावकारकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे त्याने सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. सावकारकीच्या जाळ्यात अडकून आत्महत्या करणारा आतुल पाटील हा काही पहिलाच व्यक्ती नसून, आतापर्यंत अनेक जणांनी अशा प्रकारातून टोकाचे पाऊल उचलले आहे.

वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.