गुजरात : मुलुंड, विरारनंतर आता गुजरातमध्ये गरबा नाचताना तरुणाचा मृत्यू (Garba Dance in Gujrat) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नी दोघेच घरात गरबा नाचत होते. गरबा नाचल्यानंतर पती चक्कर येऊन खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने पतीला रुग्णालयात दाखल नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित (Death Declaired) केले. सूरतमधील लिंबायत परिसरातील (Limbayat Area in Surat) आकार रेसिडेंसीमध्ये ही घटना घडली आहे. दीपक माधव पाटील असे मयत 34 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
दीपक पाटील मूळचा महाराष्ट्रातील मालेगावचा रहिवासी असून नोकरीनिमित्त सूरत येथे पत्नीसोबत राहत होता. दीपक पाटील आणि वेदिका उर्फ साक्षी पाटील यांचा चार वर्षापूर्वीच विवाह झाला होता. दीपक सूरतमध्ये डायमंड वर्करची नोकरी करत होता.
दीपक नवरात्रीनिमित्त त्याचा मित्र चेतनच्या घरी पत्नीसह गरबा नाचण्यास जाणार होता. मात्र चेतनच्या घरी पाहुणे आल्यामुळे त्यांचा गरबा नाचण्याचा प्लान फिस्कटला. त्यामुळे चेतन आणि वेदिकाने घरीच म्युझिक लावून नाचण्याचा प्लान केला.
मोबाईल गरब्याची गाणी लावून दीपक आणि वेदिका गरबा नाचत होते. गरबा नाचता नाचता वेदिका दमल्यामुळी ती सोफ्यावर जाऊन बसली. तर दीपक नाचत होता. नाचता नाचता दीपक चक्कर येऊन पडला आणि बेशुद्ध झाला.
पतीला बेशुद्ध पडलेले पाहून वेदिकाने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी तात्काळ दीपकच्या घरी धाव घेत त्याला रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच दीपकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.