‘प्रायव्हेट पार्ट’ कापून तरूणाची हत्या, अवघ्या 3 दिवसांवर आलं होतं त्याचं लग्न
लग्नाला अवघे तीन दिवस उरलेले असताना वराची कोणीतरी निर्घृण हत्या केली. त्याचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले.
कानपूर : माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका तरूणाचे लग्न तीन दिवसांवर आलेले असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या तीन दिवस आधी हा धक्कादायक प्रकार घडला. बुधवारी या तरुणाचा हळदी समारंभ होता. लग्नासाठी हळद लावल्यानंतर तो घराबाहेर पडला असता गुरुवारी सकाळी शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.
तरुणाचा मृतदेह पोलिसांसाठी गूढ बनला आहे. कारण, जिथे हा मृतदेह सापडला, तिथे दारूचे पाऊच, दोन रिकामे ग्लास पडलेले होते. तरुणाचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला होता. तसेच त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. अशा स्थितीत त्याची हत्या झाल्याचे दिसून आले असले तरी या निर्घृण हत्येचे कारण काय, याचा तपास आता पोलीस करत आहेत. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
कोण आहे हत्या झालेला युवक ?
कानपूरमधील घाटमपूर भागातील तारगावजवळ गुरुवारी सकाळी शेतात एक मृतदेह आढळून आला. पँट शर्ट घातलेल्या तरुणाचे वय अंदाजे 27 वर्षे होते. जवळच दारूचे रिकामे पाऊच पडलेले होते आणि दोन रिकामे ग्लासही होते. सर्वात मोठी बाब म्हणजे मारेकऱ्याने तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापला होता. गुरुवारी सायंकाळ होताच तरुणाची ओळख पटली. मोहनपूर गावातील लोकांनी पोलिसांना गाठून सांगितले की, धर्मेंद्र कुरील असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा हळदीचा सोहळा बुधवारी झाला. हळद लावून तो घराबाहेर पडला. 11 जून रोजी त्याचे लग्न लागणार होते.
अशा स्थितीत लग्नाच्या अवघ्या ३ दिवस आधी त्याला कोणी मारले, कोणासोबत तो बाहेर गेला याचे उत्तर कोणाकडे नाही. नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. त्यांनी कोणावरही संशय घेतला नाही, असे पोलिसांनी नमूद केले.
पोलीस शोधत आहेत एका प्रश्नाचे उत्तर
पण कुटुंबीयांना एक गोष्ट समजत नाही की तो रात्री बेपत्ता झाला. तेव्हा त्याच्या गायब होण्याबद्दल कोणीही पोलीस अधिकारी किंवा पोलीस ठाण्यात का सांगितले नाही ? तरुणाची हत्या करताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्यामागे काय कारण आहे? पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याच्या इतर नातेसंबंधांचा तपास करण्यासाठी पोलिस सीडीआर काढत आहेत. या तरुणाकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती आहे. अशा स्थितीत त्याच्या हत्येचे रहस्य काय आहे, हे जाणून घेणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.