मैत्रिणीकडे वाढदिवसासाठी गेली पण तिनेच घात केला… बदलापूर पुन्हा हादरलं

राज्यातील लैंगिक अत्याचाराच्या अेक घटना गेल्या काही दिवसांत उघड झाल्या असून त्यामुळे सर्वत्रच संतापाचे वातावरण आहे. याचदरम्यान मुंबईपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या बदलापूरमध्ये पुन्हा एक अत्याचाराची घडली असून एका तरूणीने तिच्याच मैत्रिणीचा घात केल्याचे उघडकीस आले आहे.

मैत्रिणीकडे वाढदिवसासाठी गेली पण तिनेच घात केला... बदलापूर पुन्हा हादरलं
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 9:53 AM

राज्यातील लैंगिक अत्याचाराच्या अेक घटना गेल्या काही दिवसांत उघड झाल्या असून त्यामुळे सर्वत्रच संतापाचे वातावरण आहे. याचदरम्यान मुंबईपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या बदलापूरमध्ये पुन्हा एक अत्याचाराची घडली असून एका तरूणीने तिच्याच मैत्रिणीचा घात केल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिच्या मैत्रिणीनेचे तिला शीतपेयामधून गुंगीच औषध दिलं आणि तिचा घात केला. याप्रकरणी पीडित तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्या तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

रात्री पार्टीसाठी गेली पण सकाळी परत आलीच नाही…

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी बदलापूर पूर्व भागात राहते. तिची काही दिवसांपूर्वीच शिरगाव परिसरात राहणाऱ्या भूमिका मेश्राम या तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसापूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं. रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिका हिने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकलं. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्या तरुणीवर भूमिका हिच्या घरी एका मित्राने लैंगिक अत्याचार केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने पीडितेच्या पालकांनी भूमिका हिच्याशी संपर्क साधून चौकशी केली. तेव्हा तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचं भूमिकाने त्यांना सांगितलं. त्यामुळे पालकांनी तातडीने तिचं घर गाठलं, आणि त्यांच्या मुलीला कसंबसं घरी आणलं. मात्र घरी आल्यावर तिला शुद्ध आली. आणि तेव्हाच तिला तिच्यावर अत्याचार झाल्याचं लक्षात आलं. या घटनेची माहिती तिने पालकांना दिल्यावर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत त्यात तरूणीची वैद्यकीय चाचणी केली असता, त्या तरूणीवर तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र हा लैगिक अत्याचार एका मित्राने केला, की दोघांनी? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

याप्रकरणी पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण भूमिका मेश्राम, साताऱ्याहून आलेला शिवम राजे(22) आणि संतोष रुपवते (40) या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.