आजारपणामुळे नोकरी गेली, कमाई गेल्यामुळे उपचाराचा खर्च झेपेना; मग तरुणाने युट्यूब पाहिले अन्…
नोकरी गेल्याने आजारपणाचा खर्च करण्यासाठी पैसे नव्हते. यामुळे औषधोपचाराच्या सर्व खर्चाचा बोजा आई-वडिलांवर पडत असल्याने तरुण सतत नैराश्येत होता.
दिल्ली : आजारपण आणि त्यासाठी लागणारा खर्च यामुळे तणावाखाली आलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. दिल्लीतील आदर्श नगर भागातील अभिषेक हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. युट्यूबवर जीवन संपवण्याची आयडिया घेतली. मग तरुणाने हॉटेलच्या रुममध्ये ऑक्सिजनचा ओव्हरडोस घेत मृत्यूला कवटाळले. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली आहे. नितेश असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे.
आजारपणामुळे नोकरी गेल्याने तणावात होता
मुखर्जी नगर येथील रहिवासी असलेला नितेश ही सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होता. मात्र तो आजारी असल्याने त्याची ही नोकरी गेली. यामुळे त्याच्या उपचाराचा सर्व बोजा त्याच्या वडिलांवर आला होता. यामुळे नितेश खूप तणावात होता आणि जीवनाला कंटाळला. यातूनच त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
युट्यूबवर पाहून आयडिया घेतली
यासाठी त्याने युट्यूबवर अनेक आयडिया सर्च केल्या. युट्यूबवर सर्च केल्यानंतरच त्याला ही अनोखी कल्पना सुचली. यासाठी त्याने हॉटेलमध्ये एक रुम बुक केली आणि योजना अंमलात आणली. नितेशने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अन्य एका घटनेत व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत तरुणाने जीवन संपवले
व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत फळ विक्रेत्या तरुणाने मृत्यूला जवळ केल्याची घटना काल महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात उघडकीस आली. याप्रकरणी सांगली पोलीस अधिक तपास करत आहेत. तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. तपासाअंती सर्व सत्य उघड होईल.