बालकांबाबत आक्षेपार्ह फिल्म पाहणे महागात पडेल, एनसीबीआरच्या रडारवर सोशल मीडिया

मुलांविरोधातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी इंटरनेटवरील आक्षेपार्ह कंटेंट हटवणे याकडे एनसीबीआरने प्रामुख्याने लक्ष दिले आहे. याच अनुषंगाने एनसीबीआरने राजस्थानातील तरुणाच्या संशयास्पद घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले होते.

बालकांबाबत आक्षेपार्ह फिल्म पाहणे महागात पडेल, एनसीबीआरच्या रडारवर सोशल मीडिया
राजस्थानमध्ये एनसीआरबी आणि एटीएसची संयुक्त कारवाईImage Credit source: social
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 4:50 PM

बाडमेर : गुगल किंवा सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर लहान मुलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ पाहणे आता महागात पडणार आहे. जे लोक मोबाईलवर अशाप्रकारे व्हिडिओ सर्च करतात, त्यांची तुरुंगात रवानगी होऊ शकते. पोलिसांनी हे प्रकार रोखण्यासाठी सोशल मीडियावर करडी नजर रोखली आहे. या विशेष मोहिमेंतर्गत राजस्थानमध्ये एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीबीआर) केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केली आहे. गुगल आणि सोशल मीडियामध्ये मुलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ डाउनलोड करुन पाहणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबीआरच्या विशेष मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

एनसीबीआरने एटीएसला लिहिले पत्र

अलीकडच्या काळात लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यामागे इंटरनेटचा देखील अतिरेकी वापर होत असल्याचे उघड झाले आहे. सोशल मीडियाच्या विश्वात लहान मुलांचे देखील अश्लील व्हिडिओ बनवले जातात. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरलसुद्धा होत आहे. याचा लहान मुलांवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे.

मुलांविरोधातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी इंटरनेटवरील अश्लील कंटेंट हटवणे याकडे एनसीबीआरने प्रामुख्याने लक्ष दिले आहे. याच अनुषंगाने एनसीबीआरने राजस्थानातील तरुणाच्या संशयास्पद घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले होते.

हे सुद्धा वाचा

आरोपी लहान मुलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ करत होता व्हायरल

आरोपी तरुणाने लहान मुलांचे मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह व्हिडिओ डाऊनलोड करून ते व्हायरल करण्याचे काम सुरू ठेवले होते. यासंदर्भात सबळ पुरावे हाती लागल्यानंतर एनसीबीआरने कारवाईसाठी दहशतवाद विरोधी पथकाला पत्र लिहिले होते. या दोन्ही तपास यंत्रणांनी संयुक्तरीत्या गुन्ह्याचा अधिक तपास करून आरोपीच्या हातात बेड्या ठोकल्या.

एनसीबीआर आणि एटीएसची संयुक्त कारवाई

भवरलाल असे आरोपी युवकाचे नाव असून तो बाडनेरच्या इंदिरा कॉलनीतील रहिवासी आहे. एनसीबीआर आणि एटीएसकडून सूचना मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपीचा थांगपत्ता लावून त्याला अटक करण्यात यश मिळवले.

भवरलाल हा गुगल आणि सोशल मीडियामध्ये लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ पाहायचा. हे कृत्य एक प्रकारचे गुन्हाच आहे, असे जाहीर करत पोलिसांनी भवरलाल विरोधात कारवाई केली आहे.

आरोपी विरोधात भादंवि कलम तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून भवरलालचे अन्य साथीदार आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.