Ahmednagar Crime : बसमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद टोकाला गेला, कॉलेजसमोरच विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

नगरमध्ये गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. क्षुल्लक कारणातून हत्या, हाणामारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

Ahmednagar Crime : बसमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद टोकाला गेला, कॉलेजसमोरच विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला
क्षुल्लक वादातून महाविद्यालयीन तरुणावर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 3:07 PM

अहमदनगर / 2 ऑगस्ट 2023 : पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाणीची ताजी असताना पुन्हा एक हाणामारीची घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये सीटवर बसण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज महाविद्यालया समोर ही घटना घडली. या हल्ल्यात सदर तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युवराज गुंजाळ असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

युवराज गुंजाळ हा तरुण नेहमीप्रमाणे बसने कॉलेजला चालला होता. यावेळी बसमध्ये सीटवरुन त्याचा काही तरुणांशी वाद झाला. याच वादाचा राग मनात धरुन आरोपींनी तरुणाचा कॉलेजपर्यंत पाठलाग केला. यानंतर कॉलेजसमोरच विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. यानंतर हल्लेखोर पसार झाले. घटना इतकी अचानक घडली की पाहणाऱ्यांनाही नक्की काय चालले हे कळं नाही. घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.

महाविद्यालयासमोरच हा हल्ला झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी तरुणाला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा कसून शोध सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

अहमदनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून हत्या आणि मारामारीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात तीन खून झाल्याने शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.