मोमोज खाण्याची मित्रांसोबत पैज लावली, पैज जिंकला मात्र आयुष्याशी हरला !

हल्लीची तरुणाई फास्ट फूडच्या अधीन गेली आहे. पिझ्झा, बर्गर, चायनीज, मोमोज हे पदार्थ तरुणाईला अधिक प्रिय असतात. पण हेच फास्ट फूड कधी कधी जीवावर बेतू शकतं याचं उदाहरण देणारी घटना बिहारमध्ये घडली आहे.

मोमोज खाण्याची मित्रांसोबत पैज लावली, पैज जिंकला मात्र आयुष्याशी हरला !
मोमोज खाल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 12:01 PM

गोपालगंज : तरुणाईमध्ये हल्ली मोमोज खाण्याची क्रेझ फार वाढली आहे. हीच क्रेझ एका तरुणाला महागात पडली आहे. मोमोज खाल्ल्यानंतर तरुणाला अस्वस्थ वाटू लागले, मग काही वेळात तो बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विपिन कुमार पासवान असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुण मोबाईल शॉप चालवायचा. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस मृत्यू प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला? हे तपासाअंतीच स्पष्ट होईल. पोलीस प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

मोमोज खाण्याची पैज जीवावर बेतली

विपिन शुक्रवारी आपल्या दुकानात बसला होता. त्याचे मित्र आले आणि त्याला मोमोज खायला सोबत घेऊन गेले. मित्रांमध्ये कोण किती मोमोज खाणार याबाबत पैज लागली होती. यावेळी विपीनने 150 मोमोज खाऊन पैज जिंकली. यानंतर सर्व आपापल्या कामाला परत निघून गेले. विपिनही त्याच्या दुकानात आला. मात्र दुकानात आल्यानंतर थोड्या वेळात त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर बेशुद्ध पडला.

कुटुंबीयांचा हत्या झाल्याचा आरोप

घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाच्या मुत्यूनंतर कुटुंबीयांनी त्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. आपला मुलगा मोमोज खाऊन मेला नाही कर त्याला विष घालून मारण्यात आले आहे, असा आई-वडिलांनी आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.