व्हियाग्राचं अतिसेवन नडलं, त्या लॉजवर नेमकं काय घडलं?; या तरुणांना झालं तरी काय?

bhandara Crime News : शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे भंडारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे. त्या तरुणाने नेमक्या कोणत्या गोळ्या घेतल्या होत्या याची सध्या चौकशी पोलिस करीत आहेत.

व्हियाग्राचं अतिसेवन नडलं, त्या लॉजवर नेमकं काय घडलं?; या तरुणांना झालं तरी काय?
bhandara crime newsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 12:16 PM

भंडारा : शक्तीवर्धक गोळ्याचा चुकीच्या पद्धतीने वापर सुरु असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अनेकांचा मृत्यू झाल्यानंतरही अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत. भंडारा (bhandara crime news) जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली. त्यामुळे पोलिस (bhandara police) प्रशासन चांगलचं जागं झालं आहे. शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनानं तरुणाचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. भंडारा इथल्या लॉजवर मैत्रिणीसोबत काल रात्री घालवायची असल्यामुळे त्या तरुणाने “व्हियाग्रा” नावाच्या गोळ्या घेतल्या असल्याचं पोलिसांनी प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर त्या तरुणाचा शवविच्छेदन अहवाल (postmortem report) आल्यानंतर नेमकं कशामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला हे स्पष्ट होईल.

तरुणीसोबत रात्र घालवायची असल्यामुळं…

ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो नागपूरचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका मुलीशी त्याची मैत्री झाली. त्याचं मोबाईलवरती बोलणं वाढल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले.त्यानंतर दोघांच्या भेटी वाढल्या, त्यांची अनेकदा भंडारा जिल्ह्यात भेट होत होती. विशेष म्हणजे दोघांची ओळख दोन महिन्यापूर्वी झाली होती. त्या तरुणीसोबत रात्र घालवायची असल्यामुळे त्याने शक्तीवर्धक गोळ्यांचं अतिसेवन केलं होतं.

तरुणाचा रक्तदाब वाढल्यामुळं…

भंडारा इथल्या लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना घटना घडली आहे. तरुणानं “वायग्रा” या गोळ्यांचं शक्तिवर्धकासाठी अतिसेवन केलं आणि त्यात तरुणाचा रक्तदाब वाढल्यानं हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. मृतक तरुण 27 वर्षीय आहे, तर, त्याची मैत्रीण 23 वर्षीय आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांची एका ठिकाणी भेट झाली.

हे सुद्धा वाचा

तरुणाचं अंग थंडगार पडलं

शक्तीवर्धक गोळ्याचं अतिसेवन केल्यानं तरुणाचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला, तरुणाचं अंग थंडगार पडल्यानंतर त्याच्यासोबत असलेली त्याची मैत्रीण घाबरुन गेली. मैत्रिणीनं लॉजच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. शवविच्छेदन अहवालाची पोलिस वाट पाहत असून त्यानंतर तपासाची दिशा ठरेल. त्याचबरोबर त्या तरुणाच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह देण्यात येणार आहे.

ही घटना घडल्यापासून या तरुणांना झालंय तरी काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.