रेल्वेच्या आरक्षित तिकीटात काळाबाजार, कुठं झाली मोठी कारवाई ?
मालेगावात अशरफ रशीद खान या ठकबाजाने असाच आरक्षित तिकीटांचा काळाबाजार करत असल्याची माहिती रेल्वेच्या वाणिज्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार मालेगावमध्ये सापळा रचण्यात आला होता.
मनमाड (नाशिक) : रेल्वेचे आरक्षण मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असतांना आता दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशरफ रशीद खान या 36 वर्षीय संशयिताला रंगेहाथ अटक करण्यात आली असून मनमाड येथील रेल्वेच्या वाणिज्य विभागाने ही कारवाई केली आहे. त्याच्याकडून विविध रेल्वे स्थानकांच्या आरक्षित १६ हजारांची तिकिटे हस्तगत करण्यात आली असून रेल्वेची मोठी कारवाई मानली जात आहे. खरंतर ज्या शहरात रेल्वेस्थानक नाही पण शहर मोठे आहे. अशा शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट आरक्षित करण्याची सुविधा असते. याची माहिती अनेकांना नसल्याने काही व्यक्ती याचा गैरफायदा घेत आरक्षित तिकीटांचा काळाबाजार करत असतात. असाच प्रकार मालेगाव शहरात उघडकीस आला आहे.
मनमाड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. काही मोजक्या रेल्वे येथे थांबत नसून इतर सर्वच रेल्वे मनमाड येथे थांबत असतात. मात्र, जवळ असलेल्या मालेगाव शहरात पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट सेवा आहे.
मालेगाव शहर हे मोठे शहर असून तिथे रेल्वे सेवा किंवा स्थानक नाही. त्यांना मनमाड शहर रेल्वेसेवेच्या दृष्टीने महत्वाचे असून मालेगावात पोस्टात रेल्वेची तिकिटे मिळतात.
ही सेवा खरंतर अनेकांना माहिती नसते, त्याचाच गैरफायदा घेत काळाबाजार करणारे अनेक ठकबाज समाजात आहे.
मालेगावात अशरफ रशीद खान या ठकबाजाने असाच आरक्षित तिकीटांचा काळाबाजार करत असल्याची माहिती रेल्वेच्या वाणिज्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार मालेगावमध्ये सापळा रचण्यात आला होता.
मालेगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये सापळा रचत ही कारवाई करण्यात आली असून त्याने तिकीटात काळाबाजार करत असल्याची कबुली दिली असून त्याच्यावर मनमाड येथे विविध कलमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.