पंजाब : बंदुक दाखवताना पोलीस कर्मचाऱ्याकडून अचानक गोळी सुटल्याची घटना पंजाबमधील अमृतसरमध्ये घडली आहे. या घटनेत मोबाईल दुकानातील तरुण गंभीर जखमी (Youth injured in Firing) झाला आहे. गोळीबाराची ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Incident Caught in CCTV) झाली आहे. हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियात (Video Viral on Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर टीका होत आहेत.
अमृतसर येथील मोबाईल रिपेरिंग दुकानात पंजाब पोलीस दलातील एक कर्मचारी आला. कर्मचाऱ्याने दुकानात आल्यानंतर आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून काऊंटरवर ठेवली. रिव्हॉल्वर दुकानातील लोकांना दाखवत होता आणि काऊंटरवर फिरवत होता.
#WATCH | A youth working in a mobile shop got injured in an alleged accidental firing by a policeman in Punjab’s Amritsar
The accused police official has been suspended. We’ve recovered the CCTV footage: Varinder Singh, ACP North, Amritsar
(CCTV visuals) pic.twitter.com/N8R0VpMhH0
— ANI (@ANI) October 19, 2022
मात्र रिव्हॉल्वर फिरवत असताना कर्मचाऱ्याने अचानक ट्रिगर दाबला आणि बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी दुकानातील एका तरुण कर्मचाऱ्याला लागली. या गोळीबारात कर्मचारी गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गोळीबार प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई केली जाईल, असे अमृतसरचे नॉर्थ विभागाचे एसपी वरिंदर सिंह यांनी सांगितले.
पोलीस कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे ही गोळीबाराची घटना घडली. यात एक तरुण जखमी झाला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अद्याप कळू शकले नाही. तूर्तास या कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून, सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या माहितीवरुन पुढील कारवाई करण्यात येत आहे.