Thane Crime : मोबाईल न दिल्याच्या रागातून तरूणाची हत्या, मृतदेह लपवण्यासाठी लढवलेली शक्कल पाहून…

तरूणाने दुसऱ्या इसमाकडे मोबाईल मागितला, मात्र त्याने तो दिला नाही. यामुळे तो भडकला आणि त्याने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि थेट त्याच्या डोक्यात...

Thane Crime : मोबाईल न दिल्याच्या रागातून तरूणाची हत्या, मृतदेह लपवण्यासाठी लढवलेली शक्कल पाहून...
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 8:40 AM

अंबरनाथ | 7 सप्टेंबर 2023 : राज्यातील गुन्ह्यांचं प्रमाण आणि त्याची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. छोट्या-मोठ्या कारणावरून लोकं एकमेकांच्या जीवावर उठायला देखील कमी करत नसल्याचे समोर आले आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. मोबाईल मागितला, पण तो दिला नाही याचा एका तरूणाला एवढा राग आला की त्याने मागचा-पुढचा काहीच विचार न करता समोरील व्यक्तीच्या डोक्यात सरळ लोखंडी रॉडने (iron rod) वार केला. मात्र तो वार जीवघेणा ठरला आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यावर (crime news) संपूर्ण शहरातच दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

त्या दिवशी नेमकं काय झालं ?

ही दुर्दैवी घटना अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव परिसरात एमआयडीसी जवळ एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. हे बांधकाम सुरू असताना तेथे लालजी सहाय हा तरुण फोनवर होता. तेवढ्या शंभू मांझी हा तरूण तिकडे आला आणि त्याने लालजी यांच्याकडे मोबाईल मागितला. मात्र लालजी यांनी त्याला मोबाईल देण्यास नकार दिला. मात्र याचा शंभूला प्रचंड राग आला आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता संतापाच्या भरात बाजूला पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि लालजी यांच्या डोक्यात जोरात वार केला. तो घाव वर्मी बसल्याने लालजी यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र हे पाहून शंभू भानावर आला आणि मृतदेह पाहून घाबरला.

अशी लावली मृतदेहाची विल्हेवाट

या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्न त्याला पडला. मदतीसाठी त्याने मनोदीप जामु, चिल्ला मांझी या दोन मित्रांची मदत घेतली आणि पालेगाव जवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या एका डबक्यात तो मृतदेह फेकून ते तिघेही फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस दाखल घटनास्थळी झाले. त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन वेगाने तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी 40 संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता तिघांवर संशय बळावला. त्यानंतर खबरीही कामाला लागले आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून शंभू मांझी,मनोदीप जामु,चिल्ला मांझी या तिन्ही आरोपींना अंबरनाथ मधून अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिनही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावले, अशी पोलीस निरीक्षकांनी दिली.

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.