गोळीबाराच्या घटनांनी ठाणे हादरले, दिवसभरातील दुसरी घटना; कारण काय?

लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथे मामा भाचा डोंगराच्या खाली गणेश जाधववर अज्ञात इसमांनी गोळीबार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.

गोळीबाराच्या घटनांनी ठाणे हादरले, दिवसभरातील दुसरी घटना; कारण काय?
गोळीबाराच्या घटनांनी ठाणे हादरले
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 3:47 PM

ठाणे : सकाळची गोळीबाराची घटना ताजी असतानाच ठाण्यात दुपारी पुन्हा गोळीबार (Firing at Thane) झाला आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथे ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी (major injured) झाला आहे. गणेश जाधव उर्फ काळा गण्या असे गोळीबारात जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वर्तक नगर पोलीस (Vartak Nagar Police) आणि गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

जखमी तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा

गणेश जाधव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. मात्र त्याच्यावर गोळीबार कोणत्या कारणातून झाला आणि कुणी केला हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी पोलिसांना गोळीची पुंगळी आढळून आली आहे.

लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथे मामा भाचा डोंगराच्या खाली गणेश जाधववर अज्ञात इसमांनी गोळीबार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. या गोळीबारात गणेशच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच वर्तक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी तरुणाला ताब्यात घेत उपचारासाठी वेदांत रुग्णालयात दाखल केले. तपाअंतीच हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की वैयक्तिक कारणातून हे स्पष्ट होईल.

पहाटे घंटाळी परिसरात घडली गोळीबाराची घटना

याआधी आज पहाटेच्या सुमारास दोन गटातील संपत्तीच्या वादातून घंटाळी परिसरातील उच्चभ्रू वस्तीत गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेच एक जण गंभीर जखमी झाला आहे.

जखमी व्यक्ती आणि त्याचा एक सहकारी आपल्या कार्यालयात कंदील लावण्याचे काम करत होते. यावेळी हल्लेखोर तेथे पोहचला आणि त्याने गोळीबार केला.

जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.