एकीवरच दोघांचा जीव जडला होता, मग मुलीचे प्रेम मिळवण्याच्या वादात भररस्त्यात जे घडलं त्याने सर्व हादरले !

लव ट्रायंगलमधून भलतीच घटना उघडकीस आली आहे. एकाच मुलीवर दोघांचा जीव जडला होता. यातून भररस्त्यात जे घडलं त्याने परिसर हादरला.

एकीवरच दोघांचा जीव जडला होता, मग मुलीचे प्रेम मिळवण्याच्या वादात भररस्त्यात जे घडलं त्याने सर्व हादरले !
प्रेमाच्या जाळ्यात ओढत महिलेला लाखोंचा गंडा
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 12:06 PM

सूरज / 19 ऑगस्ट 2023 : सूरतमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून भररस्त्यात एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत तरुणाच्या मित्राने मोबाईलमध्ये ही थरारक घटना कैद केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अजहरुद्दीन ऊर्फ अजहर अहमद असे आरोपीचे नाव आहे. तर बादल ऊर्फ पार्थ रमेश अहिरकर असे पीडिताचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

काय आहे प्रकरण?

नानपुरा परिसरातील पटेल चेंबरच्या पाचव्या मजल्यावर तरुणीच्या भावाची बर्थडे पार्टी होती. या बर्थडे पार्टीला तरुणीचा प्रियकर अजहर अहमद आला होता. तसेच मयत बादलही आला होता. बादलही तरुणीवर प्रेम करत होता आणि त्याचे प्रेमसंबंध स्वीकरण्यासाठी दबाव टाकत होता. ही बाब अजहरलाही माहिती होती. यामुळे पार्टीत त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला. पार्टी संपल्यानंतर तिघेही घरी जायला निघाले.

पार्टी हॉलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला. अजहरने बादलवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात बादलचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बादलसोबत असलेल्या त्याच्या मित्राने मोबाईलमध्ये हल्ल्याची घटना कैद केली. आरोपीने त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाण्यास यशस्वी झाल्याने बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. आरोपीला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.