Pune Crime : नातेवाईकाच्या मुलीबाबत ‘नको ते’ बोलल्याने तरूणाचा खून, पुणं हादरलं
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून खून करण्यात आल्याचा अतिशय खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बसवराज चिदानंद गजंत्रे ( वय 26) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत
पुण्यातून गुन्ह्याची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून खून करण्यात आल्याचा अतिशय खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बसवराज चिदानंद गजंत्रे ( वय 26) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मुलीबाबत अपशब्द वापरल्याने हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरानगर परिसरात नियोजित व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी अनेक दुकानांसाठी गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र तेथील एका गाळ्यामध्ये तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी त्या तरूणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे समोर आले. बसवराज चिदानंद गजंत्रे असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याने नातेवाईकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरले होते. तो वाईटसाईट बोलला होता, यामुळेच वाद झाला आणि संशयित आरोपीने त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगड घालून मारहाण केली. यामध्ये बसवराज हा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असे समजते. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे असे समजते.