UP Firing : गायिकेने गाणे गायला नकार दिला, माथेफिरुंनी गार्ड आणि फ्लोर मॅनेजरवर गोळीबार केला

पोलिसांना पाहताच तीन आरोपी तेथून पळून गेले. तर अन्य तिघांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून पिस्तुल हस्तगत केले आहे.

UP Firing : गायिकेने गाणे गायला नकार दिला, माथेफिरुंनी गार्ड आणि फ्लोर मॅनेजरवर गोळीबार केला
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 11:37 PM

उत्तर प्रदेश : गायिकेने आवडते गाणे गाण्यास नकार दिला म्हणून माथेफिरुंनी गार्ड (Guard) आणि फ्लोर मॅनेजर (Floor Manager)वर गोळीबार (Firing) केल्याची घटना यूपीची राजधानी लखनऊमधील एका बारमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून 3 आरोपींना अटक केली आहे. लखनौमधील एका बारमध्ये एक महिला गायिका गाणे म्हणत होती. तेथे सहा तरुण तेथे आले. त्यांनी ‘मुझे नौलखा मांगा दे’ हे गाणे गाण्यासाठी महिला गायिकेकडे मागणी केली. महिला गायिकेने गाणे गाण्यास नकार दिल्याने या तरुणांनी कारमधून पिस्तूल काढून गार्ड आणि फ्लोर मॅनेजरवर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.

तिघांना अटक, तीन जण फरार

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच तीन आरोपी तेथून पळून गेले. तर अन्य तिघांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून पिस्तुल हस्तगत केले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी लखनऊच्या विभूतीखंड पोलीस स्टेशन हद्दीतील बिग बॉस प्रतापगडचे रहिवासी आहेत. रणवीर सिंग, सुनील सिंग आणि विवेक सिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी फ्लोअर मॅनेजर संजय शुक्ला यांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

घरगुती वादातून सासरच्यांवर हल्ला करुन इसमाची आत्महत्या

पती-पत्नीमधील घरगुती वादातून एका इसमाने पत्नीसह सासरच्यांवर धारदार शस्त्राने हल्ला करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. या हल्ल्यात सासरची मंडळींसह पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचार करुन जखमींना पुढील उपचारांसाठी फरीदाबाद येथे हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Youths fired on the guard and the floor manager in bar in lucknow)

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.