युट्युबरच्या घरातील सीसीटीव्ही हॅक, आई आणि बहिणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केले

सीसीटीव्हीचा वापर आपण घरात चोरांपासून संरक्षण करण्यासाठी करीत असतो. परंतू हीच सीसीटीव्ही यंत्रणा देखील हॅक होऊ शकते, असा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका युट्युबरचा सीसीटीव्ही हॅकरने हॅक करून त्यांच्या कुटुंबातील महिलांची आक्षेपार्ह व्हिडीओ मिळवून ते समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

युट्युबरच्या घरातील सीसीटीव्ही हॅक, आई आणि बहिणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केले
cctvImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 3:13 PM

मुंबई | 15 डिसेंबर 2023 : मुंबईतील वांद्रे परिसरात राहणाऱ्या एका युट्युबरच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा हॅक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर या युट्युबरच्या आई आणि बहिणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो हॅकरने सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. या प्रकाराचा युट्युबरला जेव्हा पत्ता लागला तेव्हा त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला. या प्रकरणी युट्युबरने तातडीने पोलिस ठाणे गाठत आयटी एक्ट आणि सायबर गुन्ह्याखाली या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

21 वर्षीय युट्युबरने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्याच्या घराच्या सुरक्षेसाठी लावलेली सीसीटीव्ही यंत्रणा हॅकरने हॅक केल्याचे म्हटले आहे. या सीसीटीव्हीद्वारे युट्युबर घराबाहेर राहूनही घरात लक्ष ठेवू शकत होता. या सीसीटीव्ही यंत्रणेला कोणीतरी हॅक केली आहे. या हॅकरने कोणत्या तरी पद्धतीने त्यांच्या आई आणि बहिणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत. या हॅकरने हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत.

मित्राने कळविले

युट्युबरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की त्याला एका मित्राचा फोन आला होता. त्याच्या मित्राने सांगितले की त्याच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा एक्सेस कोणीतरी अन्य व्यक्तीने मिळविला आहे. आणि ती व्यक्ती या कॅमेऱ्याने त्याच्या मदतीने वापरीत आहे. ही माहीती मिळताच त्यांनी सीसीटीव्ही चेक केला तेव्हा 17 नोव्हेंबरला वेगवेगळ्या वेळी त्याची आई आणि बहिण अंघोळी गेल्या होत्या आणि बाहेर येताना त्यांनी कपडे घातले नव्हते. त्यावेळी हे फुटेज घेतल्याचे उघडकीस आले आहे. हॅकरने हेच फोटो आणि व्हिडीओ आपल्या सिस्टीममध्ये रेकॉर्ड करुन व्हायरल केल्याचे उघडकीस आले आहे.

तपास झाला सुरु

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की हॅकरच्या सिस्टीमचा आयपी एड्रेस ट्रेस केला आहे. या आयपीवाल्या सिस्टीमने आरोपीने युट्युबरच्या घरचा सीसीटीव्ही कॅमेरा हॅक केला होता. या प्रकरणाची तक्रार मिळताच सर्व सोशल मिडीया साईट्सना संबंधित फोटो आणि व्हिडीओ हटविण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणात आयपीसी कलम 500,501 तसेच आयटी कायदा कलम 66 ( सी ) , 66 ( ई ), 67 ( ए ) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.