झोमॅटोचा अनोखा घोटाळा उघडकीस, डीलीव्हरी बॉयने कंपनीला असा लावला चुना
जगप्रसिद्ध फूड डीलीव्हरी चेनच्या डीलीव्हरी बॉयने अनोख्या पद्धतीने घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या डीलीव्हरी बॉयने कस्टमरना कॅशने पेमेंट करण्यास फशी पाडून कंपनीला लुबाडण्याची नवीनच टेक्नीक शोधून काढल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई : प्रसिद्ध फूड चेन झोमॅटोच्या कंपनीच्या ( Zomato Ltd. ) डिलीव्हरी बॉयने अनोखी शक्कल लढवून कंपनीला चांगलाच चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्याने या डीलीव्हरी बॉय कंपनीचे डीजिटल ( digital ) व्यवहार धोक्यात आणल्याने कंपनीचे सीईओ डीपींदर गोयल यांना दखल घ्यावी लागली असून त्यांनी सिस्टीममध्ये लूप होल असल्याची कबूली आहे. त्यामुळे झोमॅटो प्रशासनाचे चांगलेच थाबे दणाणले आहेत. एका ग्राहकाने ( linkedin ) वर पोस्ट टाकून या घोटाळ्याची पोल खाल केली आहे.
झोमॅटोची फूड डीलीव्हरी चेन संपूर्ण देशात प्रसिद्ध असून या कंपनीची कमाईचे आकडे डोळे दीपविणारे आहेत. परंतू झोमॅटोच्या एका डीलिव्हरी बॉयने अनोखी शक्कल लढवून कंपनीला चांगलाच गंडा लावला आहे. या पट्ट्याने लोकांना तुम्ही ऑनलाईन पैसे न देता जर कॅशने पेमेंट केले तर तुम्हाला चांगलीच सुट मिळेल असे सांगायला सुरूवात केली. त्यानंतर त्याने अशाप्रकारे कॅशने रक्कम स्कीकारत कंपनीला चांगलेच गंडवायला सुरूवात केली.
नेमका कसा घोटाळा करायचा
झोमॅटो डीलिव्हरी बॉय लोकांना कॅशने पेमेंट केल्यास कंपनीने घसघशीत डिस्काऊंट दिल्याचे सांगायचा. त्यानंतर एक हजाराची ऑर्डर असली तरी कमी पैसे ग्राहकांकडून घ्यायचा आणि हे पैसे स्वत: कंपनीकडे जमा न करता स्वत: कडेच जमा करायचा. नंतर कंपनीला ग्राहकाने डिलीव्हरी ऑर्डर रद्द केल्याचे सांगायचा. या संदर्भात एका कस्टमरने linkedin यावर पोस्ट करून कंपनीच्या सीईओना याबाबत पोस्ट करून तक्रार केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे. कंपनीचे सीईओ दीपींदर गोयल यांनी या घोटाळ्याची दखल घेतली आहे. यापद्धतीत ‘लूप होल’ असल्याचे मान्य करीत त्यांनी काही उपाय योजावे लागतील असे मान्य केले आहे. झोमॅटोला या आर्थिक वर्षात ऑपरेटरपासून जवळपास 3,611 कोटीचे उत्पन्न झाले आहे. तर कंपनीचे मार्च 2022 चे एकूण उत्पन्न 4,108 कोटी रूपये इतके आहे.