निर्भया बलात्कार-हत्येतील नराधमांच्या फाशीची तारीख ठरली, 22 जानेवारी सकाळी 7 वाजता लटकवणार
देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कारातील नराधमांना फाशी देण्याची तारीख ठरली आहे (Death penalty to accused of nirbhaya rape case). 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता चारही दोषींना फासावर लटकावण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कारातील नराधमांना फाशी देण्याची तारीख ठरली आहे (Death penalty to accused of nirbhaya rape case). 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता चारही दोषींना दिल्लीतील तिहार जेलमध्ये फासावर लटकावण्यात येणार आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने हा निर्णय दिला. (Death penalty to accused of nirbhaya rape case) सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सतीश अरोरा यांनी सर्व चार दोषी मुकेश, रवी, विनय आणि अक्षय यांना फासावर लटकवण्याचे आदेश दिले. मात्र त्याचवेळी सर्व दोषींना 22 जानेवारीपर्यंतच दया याचिका करण्याची मुदत असेल असंही न्यायमूर्तींनी सांगितलं.
16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया व्यक्त करताना, देशातील महिलांचा न्यायपालिकेवरचा विश्वास दृढ होईल असं नमूद केलं. 22 जानेवारी हा दिवस आमच्यासाठी सर्वात मोठा दिवस असेल, असंही निर्भयाची आई म्हणाली.
4 convicts in Nirbhaya case to be hanged on January 22 at 7 am in Tihar jail, says Delhi court
— Press Trust of India (@PTI_News) January 7, 2020
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी
पटियाला हाऊस कोर्टातील न्यायमूर्तींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चारही दोषींशी संवाद साधला. यावेळी कोर्टाने मीडियाला प्रवेश नाकारला होता. ज्यावेळी कोर्टात सुनावणी सुरु होती, त्यावेळी निर्भायाची आई आणि दोषी आरोपी मुकेशची आई या दोघींनाही रडू कोसळलं.
14 दिवसांनी फासावर लटकवणार
निर्भया खटल्यातील बलात्काऱ्यांना 14 दिवसांनी फासावर लटकवण्यात येणार आहे. डेथ वॉरंट जारी केल्यानंतर नियमानुसार 14 दिवसांचा अवधी दिला जातो. या काळात जेल प्रशासन आपली तयारी पूर्ण करेल. गेल्या सुनावणीत कोर्टाने तिहार जेल प्रशासनाला दोषींना नोटीस जारी करण्याचे आदेश दिले होते.
जेलप्रशासनाची तयारी
आरोपींच्या फाशीपूर्वी डमी किंवा चाचणी घेतली जाते. गेल्या महिन्यात ती चाचणी तिहार जेलमध्ये घेण्यात आली. शंभर किलो वाळू-रेती भरुन पोत्याला गळफास लावून दोरीची क्षमता तपासण्यात आली.
यामागील उद्देश म्हणजे, दोषींना फाशी देताना, आरोपींच्या वजनाने हा दोरखंड तुटू नये, त्यामुळेच अशी चाचणी घेतली जाते. सहा वर्षांपूर्वी 9 फेब्रुवारी 2013 रोजी संसदेवर हल्ला करणाऱ्या दहशवादी अफजल गुरुला फाशी देण्यात आली होती. त्यापूर्वीही अशी चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी चाचणीदरम्यान दोरखंड तुटला होता.
निर्भया गँगरेप प्रकरणात चार आरोपींना फाशी द्यायची आहे. त्यामुळे हा दोरखंड मजबूत असावा, कोणताही घोळ होऊ नये, म्हणून जेल प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
16 डिसेंबरची काळरात्र
16 डिसेंबरच्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. यावेळी घरी जाण्यासाठी ते एका बसमध्ये चढले. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरु झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्रानं त्यांना विरोध केला. मात्र आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. तसेच तिला अमानुष मारहाणही केली. त्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती.
संबंधित बातम्या
100 किलोच्या पोत्याला फाशी देऊन चाचणी, खास दोरखंड मागवले, निर्भयाच्या मारेकऱ्यांचं काऊंटडाऊन सुरु?