एटीएमच्या माध्यमातून 412 कोटींच्या फसवणुकीचा प्रयत्न; पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त, दोघांना अटक

एटीएम कार्डधारकांचा डेटा जमा करून या माध्यमातून तब्बल 412 कोटी रूपयांचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न आज येथील रामानंद नगर पोलिसांनी उधळून लावला आहे.

एटीएमच्या माध्यमातून 412 कोटींच्या फसवणुकीचा प्रयत्न; पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त, दोघांना अटक
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 11:16 PM

जळगाव : एटीएम कार्डधारकांचा डेटा जमा करून या माध्यमातून तब्बल 412 कोटी रूपयांचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न आज येथील रामानंद नगर पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (412 crore fraud through ATMs, Ramanand nagar Police exposed racket)

मनिष भंगाळे याला जळगाव येथील आरोपी हेमंत पाटील वेळोवेळी मेसेज करून ऑनलाईन मनी ट्रान्झॅक्शन करण्याबाबत गळ घालत होता. तसेच ते काम करून देण्याच्या मोबदल्यात 20 टक्के कमिशन देणार असल्याचेदेखील त्याने सांगितले होते.

हेमंत पाटीलने मनिषला गुजरातेतील चिखली येथे आणि नाशिक येथे जाण्यास तसेच संशयित आरोपींना भेटण्यास दबावातून भाग पाडले गेले होते. नाशकातील एका बँकेचा व्यवस्थापकही या रॅकेटमध्ये सहभागी होण्यास तयार झाला होता.

पोलिसांनी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचे प्रात्यक्षिक मनीष भंगाळेकडून करून घेतले होते. त्यानुसार 15 ऑक्टोबर रोजी रात्री सापळा रचून काही खात्यांवर हे पैसे ट्रान्स्फर होत असताना पोलिसांनी छापा टाकून मनिषशी चर्चा करीत असलेल्या हेमंत पाटील आणि मोहसीन खान इस्माईल खान यांना त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल आणि दोन मोबाईलसह ताब्यात घेतले.

प्रत्यक्ष फसवणूक आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी त्यांना मनिष भंगाळे याच्या मदतीची गरज होती. या गुन्ह्यातील बाकीच्या सहा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420, 409 आणि 120 ( ब ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी दिली.

संबंधित बातम्या

नागपुरात तलवार, सुरीसारख्या घातक शस्त्रांचा साठा जप्त, दोघांना अटक

धक्कादायक..दारुड्या मुलानं केला वडिलांचा खून, अमरावतीमधील घटना

धारावीतून 2 कोटींचे ड्रग्ज जप्त, NCBची धडाकेबाज कारवाई

मुंबई क्राईम ब्रँचकडून दोन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

(412 crore fraud through ATMs, Ramanand nagar Police exposed racket)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.