अमित शाहांचा नातेवाईक असल्याची बतावणी, आमदाराला गंडा घालण्याचा प्रयत्न फसला, भामटा ताब्यात

विराज शाहने आग्रा दक्षिण विधानसभेचे आमदार योगेंद्र उपाध्याय यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला.

अमित शाहांचा नातेवाईक असल्याची बतावणी, आमदाराला गंडा घालण्याचा प्रयत्न फसला, भामटा ताब्यात
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 10:15 AM

आग्रा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे फ्रॉड करणाऱ्याला आग्रा येथे (Fraud On The Name Of Amit Shah) अटक करण्यात आली आहे. विराज शाह असं या व्यक्तीचं नाव आहे. विराज शाहने आग्रा दक्षिण विधानसभेचे आमदार योगेंद्र उपाध्याय यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगेंद्र उपाध्याय यांना विराजवर संशय आला आणि त्यांनी विराजला पोलिसांच्या स्वाधीन केले. योगेंद्र उपाध्याय यांनी विराजविरोधात नाई येथील मंडी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली (Fraud On The Name Of Amit Shah).

विराज शाह हा गेल्या पाच-सहा दिवसांपासून उपाध्याय यांना फोन करत होता. मी गृहमंत्री अमित शाहचा नातेवाईक असल्याची बतावणी तो करत होता.

विराज शाहने योगेंद्र यांना फोन करुन सांगितलं की, शाह परिवाराला आग्र्यात एक हॉटेल विकत घ्यायचं आहे. यासाठी तो रविवारी योगेंद्र उपाध्याय यांच्या घरी आला आणि त्याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्याने शॉपिंग करण्याची इच्छा व्यक्त केली. शॉपिंग करण्यासाठी तो योगेंद्र यांच्या मुलासोबत बाजारात गेला, अशी माहिती योगेंद्र उपाध्याय यांनी दिली.

त्यानंतर विराज शाहने एका दुकानातून तब्बल 40 हजार रुपयांचे कपडे खरेदी केले आणि आमदार पुत्राला पैसे देण्यास सांगितलं. तेव्हा मुलाने योगेंद्र यांना फोन करुन याची माहिती दिली. योगेंद्र यांना संशय आला आणि त्यांनी विराजला पकडण्यासाठी सापळा रचला (Fraud On The Name Of Amit Shah).

योगेंद्र यांनी गुगलवरुन विराज शाहची माहिती मिळवली. तेव्हा त्यांना कळालं की, त्याने यापूर्वीही अनेकांना गंडा घातला आहे. गुगलवरुन माहिती घेण्यापूर्वी आमदाराने आपल्या मुलाला कपडे घरी पाठवण्यास सांगितले आणि विराजला घेवून घरी येण्यास सांगितलं. विराजला याबाबत जराही शंका आली नाही की त्याला पकडण्यासाठी हा सापळा रचण्यात आला आहे.

आमदार योगेंद्र यांनी विराजला पकडण्यासाठी नाई येथील मंडी पोलिसांना माहिती दिली आणि विराजला त्यांच्या स्वाधीन केले. तसेच, जे घडलं त्याबाबत विराजविरोधात तक्रारही दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी विराज शाहला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली.

Fraud On The Name Of Amit Shah

संबंधित बातम्या :

ऑनलाईन लग्न जुळलं, पण नवरदेव आधीच विवाहित, तरुणीला फसवणारा दीड वर्षानंतर गजाआड

दुबईचं सीमकार्ड वापरत बंगळुरुतून रॅकेट ऑपरेट, नवी मुंबई पोलिसांची आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.