मुंडके छाटलेल्या मृतदेहाची ओळख पटली, अनैतिक संबंधातून हत्या, गंगापूर पोलिसांकडून क्लिष्ट खुनाचा उलगडा

औरंगाबाद नगर महामार्गावरील पुलाखाली एका मुंडके छाटलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळला होता.

मुंडके छाटलेल्या मृतदेहाची ओळख पटली, अनैतिक संबंधातून हत्या, गंगापूर पोलिसांकडून क्लिष्ट खुनाचा उलगडा
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 9:15 AM

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर पोलिसांनी एका अत्यंत क्लिष्ट खुनाचा उलगडा केला आहे. (Aurangabad Complicated Murder Case) औरंगाबाद नगर महामार्गावरील पुलाखाली एका मुंडके छाटलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा कुठलाच सुगावा लागत नव्हता. तेव्हा पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी मोठ्या शिताफीने या गुन्ह्याचा छडा लावत उलगडा केला (Aurangabad Complicated Murder Case).

मुंडके छाटलेल्या मृतदेगहाची ओळख पटवणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र तरीदेखील पोलिसांनी तपास करत अखेरीस आरोपीला मोठ्या शिताफीने जेरबंद केले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर परिसरात ढोरेगाव पुलाखाली दोन महिन्यापूर्वी सापडलेल्या मुंडके नसलेल्या प्रेताची ओळख पटली असून सदर खून महिलेचे इतरांशी असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

अश्विनी गोरख गरगडे (वय 32 राहणार वडगाव कोल्हाटी वाळूज) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून मृताच्या नंदाईने (नंदेचा पती) खुनाची सुपारी देऊन हा खून केला असल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे (Aurangabad Complicated Murder Case).

नेमकं प्रकरण काय?

औरंगाबाद पुणे महामार्गावरील ढोरेगाव जवळील पुलाखाली 20 ऑगस्ट रोजी मुंडके नसलेल्या स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात आरोपीने खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत पुलावरुन पाण्यात फेकून दिला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रेताचा पंचनामा करत ते उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले होते.

मुंडके नसलेल्या मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी मृत महिलेच्या अंगावरील कपडे, पायातील पैंजण यांच्या आधारे शिताफीने तपास केला आणि हा मृतदेह अश्विनी गोरख गरगडे या महिलेचा असल्याचं तपासात समोर आलं.

मृत महिलेचा नंदाई दत्तू सयाजी पंडितने हा खून सुपारी देऊन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अनैतिक संबंधातून महिलेचा खून झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दत्तू पंडितसह चार जणांना अटक केली आहे.

या खुनाचा उलगडा केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना पोलीस अधीक्षकांनी 15 हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.

Aurangabad Complicated Murder Case

संबंधित बातम्या :

अंत्यसंस्कारावेळी गळ्यावरील व्रण उघड, सासूच्या हत्येचा थरारक उलगडा

अमेरिकेच्या नागरिकांची फसवणूक, नालासोपाऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 10 जण ताब्यात

देशी दारुची तस्करी जोमात, भंडारा जिल्ह्यात 8 लाखांची दारु जप्त, सहा जणांना बेड्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.