चंद्रपुरात भाजप नगरसेविकेची सामाजिक कार्यकर्त्याच्या घरात घुसून तोडफोड

शहरातील वादग्रस्त आरटीआय कार्यकर्ते राजेश बेले यांच्या घरी जात नगरसेविकेने कुटुंबासह तोडफोड केली.

चंद्रपुरात भाजप नगरसेविकेची सामाजिक कार्यकर्त्याच्या घरात घुसून तोडफोड
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 7:55 PM

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटचा परिसर आज सकाळी भाजप नगरसेविकेच्या रुद्रावताराने (BJP Corporator Sabotage RTI Activists House) चांगलाच चर्चेत आला. शहरातील वादग्रस्त आरटीआय कार्यकर्ते राजेश बेले यांच्या घरी जात नगरसेविकेने कुटुंबासह तोडफोड केली. सोशल मीडियावर सततच्या बदनामीला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे नगरसेविकेने म्हटले आहे. तर नगरसेविकेच्या कुटुंबाने आपल्यावर चाकू हल्ला केल्याची वेगळी तक्रार सामाजिक कार्यकर्ते बेले यांनी नोंदविली आहे (BJP Corporator Sabotage RTI Activists House).

चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या आरटीआय तक्रारींच्या निमित्ताने सतत वादात राहणारे राजेश बेले यांच्या घरी आज भाजप नगरसेविकेने गोंधळ घालून तोडफोड केली. भाजप नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी आपल्या कुटुंबासह बेले यांचे घर गाठत तोडफोड करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे जटपुरा गेट परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

गेले काही दिवस आरटीआय कार्यकर्ते बेले यांनी स्थानिक नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्याविरोधात अनाधिकृत बांधकाम केल्याविषयी सोशल मीडिया पोस्ट टाकल्या होत्या. त्यावरुन या दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरु होता. त्याचे पर्यवसन आज थेट हल्ला आणि तोडफोडीत झाले.

दरम्यान, सततची बदनामी आणि अधिकाऱ्यांकडे होत असलेली वेगवेगळ्या कामांची नाहक तक्रार यामुळेच संतापून जात आपण हे पाऊल उचलल्याचे नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी म्हटले आहे. आरटीआय कार्यकर्ते बेले यांनी याच प्रकारातून आपल्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची बाबही वैरागडे यांनी बोलून दाखविली.

दुसरीकडे, भाजप नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी आपण स्वतः कोरोना काळात विलगीकरणात असताना मुद्दाम घराचे बांधकाम तोडत नाहक वाद उकरुन काढल्याचे बेले यांनी सांगितले आहे. तर विविध अनाधिकृत आणि बेकायदा प्रकरणात आपण आवाज उचलल्याने वैरागडे यांनी संतप्त होत आपल्यावर कुटुंबियांसह चाकू हल्ला केला, असेही बेले यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी रामनगर पोलीस ठाणे गाठत परस्परांविरोधात तक्रार नोंदविली आहे.

गेले काही महिने चंद्रपुरात आरटीआय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकरणांमध्ये सातत्याने विरोधी भूमिका घेतल्याने संघर्षाची स्थिती उद्भवली आहे. ताज्या घटनेत दोन्ही पक्ष रामनगर पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

BJP Corporator Sabotage RTI Activists Hou

संबंधित बातम्या :

मंदिरात चप्पल घालून गेल्याने वाद, दोन गटात तुफान हाणामारी, गोपीचंद पडळकरांच्या भावावर गुन्हा

धक्कादायक! भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.