Corona Effect : लुडो खेळताना तोंडावर खोकला, मित्राने ठोकला, पाच राऊंड फायर

लुडो खेळताना एक तरुण समोर उभा असलेल्या मित्राच्या तोंडावर खोकल्याने मित्राने थेट त्याच्यावर गोळीबार (boy firing while playing ludo game) केला.

Corona Effect : लुडो खेळताना तोंडावर खोकला, मित्राने ठोकला, पाच राऊंड फायर
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 1:48 PM

लखनऊ : लुडो खेळताना एक तरुण समोर उभा असलेल्या मित्राच्या तोंडावर खोकल्याने मित्राने थेट त्याच्यावर गोळीबार (boy firing while playing ludo game) केला. ही घटना उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या पायाला गोळी लागली असून सध्या त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी मित्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत (boy firing while playing ludo game) आहेत.

गोळी लागलेल्या तरुणाचे नाव प्रशांत आहे. घरची लाईट गेल्यामुळे तो घराबाहेर आपल्या मित्रांसोबत लुडो खेळत होता. लुडो खेळत असताना प्रशांतला खोकला आला. या दरम्यान प्रशांतचा मित्र गुड्डू समोर आल्याने खोकताना थुंकी गुड्डूवर उडाली. त्यामुळे रागात गुड्डूने प्रशांतवर गोळीबार केला.

एक गोळी प्रशांतच्या पायाला लागली. गुड्डूने एकूण पाच राऊंड फायर केले. यामधील बाकी गोळ्या प्रशांतला लागल्या नाहीत.

“प्रशांतच्या पायाला गोळी लागली होती. ती आम्ही काढून टाकली आहे. प्रशांतची प्रकृती गंभीर आहे, मात्र त्यात सुधारणा होईल”, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली.

नोएडा येथे घडलेल्या घटनेतील आरोपी गुड्डूवर पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी एक पथक तयार केले आहे.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.