बिग बॉसच्या अंतिम फेरीसाठी लैंगिक संबंधाची मागणी, महिला पत्रकाराचा गौप्यस्फोट

रियालिटी शो बिग बॉस 3 (तेलगू) लवकरच टेलिकास्ट होणार आहे. मात्र, बिग बॉसचा हा शो सुरु होण्याच्याआधीच मोठा गौप्यस्फोट झाला आहे. या शोच्या 4 आयोजकांनी अंतिम फेरीतील प्रवेशासाठी आपल्याकडे लैंगिक संबंधाची मागणी केल्याचा गंभीर आरोप हैदराबादमधील एका महिला पत्रकाराने केला आहे.

बिग बॉसच्या अंतिम फेरीसाठी लैंगिक संबंधाची मागणी, महिला पत्रकाराचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Jul 14, 2019 | 10:22 PM

हैदराबाद:  रियालिटी शो बिग बॉस 3 (तेलगू) लवकरच टेलिकास्ट होणार आहे. मात्र, बिग बॉसचा हा शो सुरु होण्याच्याआधीच मोठा गौप्यस्फोट झाला आहे. या शोच्या 4 आयोजकांनी अंतिम फेरीतील प्रवेशासाठी आपल्याकडे लैंगिक संबंधाची मागणी केल्याचा गंभीर आरोप हैदराबादमधील एका महिला पत्रकाराने केला आहे. या महिला पत्रकाराने याबाबत चारही आरोपींविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

शोच्या अंतिम फेरीत प्रवेशासाठी आयोजक अभिषेक, रविकांत, रघु आणि श्याम यांनी लैंगिक संबंधाची मागणी केल्याची माहिती महिला पत्रकाराने दिली. त्यानंतर याप्रकरणी हैदराबादच्या बंजारा हिल्स पोलीस स्टेशनमध्ये कलम 354 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीनिवास राव म्हणाले, “13 जुलैला माझ्याकडे एका वरिष्ठ महिला पत्रकार आणि अँकरचा फोन आला होता. त्यांना मार्च महिन्यात शोच्या आयोजकांकडून फोन आला होता. तेव्हा त्यांना बिग बॉससाठी निवडल्याचे सांगण्यात आले. ऑफर मिळाल्यानंतर महिला पत्रकाराने शोमध्ये जाण्याचे ठरवले. तसेच चारही आयोजकांची भेट घेतली. या भेटीत अंतिम फेरीतील निवडीसाठी आपल्या बॉसला खूश करावे लागेल, असे सांगण्यात आले.

बिग बॉस 3 (तेलगू) या शोसाठी साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन होस्टिंग करणार होते, असेही सांगण्यात येत आहे. या शोचा 2017 मध्ये पहिला सीजन आला होता.

नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?.
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.