दररोज गांजाचे सेवन, फ्लॅटमध्ये भुताचा भास, सुशांतच्या कूककडून धक्कादायक खुलासे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी मुंबईत सीबीआयचे पथक दाखल झाले आहे (CBI inquiry Cook Neeraj Singh).

दररोज गांजाचे सेवन, फ्लॅटमध्ये भुताचा भास, सुशांतच्या कूककडून धक्कादायक खुलासे
Follow us
| Updated on: Aug 23, 2020 | 11:11 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी मुंबईत सीबीआयचे पथक दाखल झाले आहे (CBI inquiry Cook Neeraj Singh). सीबीआयचे पथक दाखल झाल्यानंतर सीबीआयची नजर सर्वात आधी सूशांतचा कूक निरज सिंहवर पडली. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा सीबीआयने निरजची चौकशी केली आहे. या चौकशीत निरजने अनेक धक्कादायक खुलासे सुशांतबाबत केले आहेत (CBI inquiry Cook Neeraj Singh).

दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी (21 ऑगस्ट) निरजची सीबीआयने दहा तास चौकशी केली. तर शनिवारी म्हणजेच 22 ऑगस्टला साडे दहा तास चौकशी केली. त्यानंतर पुन्हा निरजची चौकशी करण्यात आली. दोन दिवस सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी निरजकडून स्वतंत्रपणे चौकशी करत सुशांत आणि त्याच्या घरी कोण कोण येत होतं, याची माहिती घेतली. मात्र आता निरजला सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीसोबत बसवून एकत्र चौकशी केली.

“सुशांत सरांनी मृत्यूआधी 3 दिवस गांजाचं सेवन केलं होतं. पार्ट्यांमध्येही सुशांत सर गांजाचं सेवन करायचे. आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी रिया आणि आयुषसोबत घरी पार्टी व्हायची. त्यावेळी सुशांत दारु आणि गांजा घ्यायचे. गांजावाली सिगारेट घरीच असायची. सुशांत सरांच्या आत्महत्येआधी त्यांच्यासाठी मी मॅरुआना सिगारेट 3 दिवस पुरेल एवढ्या, सिगारेट बॉक्समध्ये ठेवल्या होत्या. मात्र आत्महत्येनंतर पाहिलं तर तो सिगारेट बॉक्स रिकामा होता”, असं निरजने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

“सुशांत सर डिसेंबर 2019 मध्ये माऊंट ब्लॉक अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले. मात्र वांद्र्यातच राहत असलेल्या कॅप्री हाईट्समध्ये आम्हाला वॉकीटॉकीचे सेट्स दिले होते. ज्यावरुन आम्हाला सुशांत सर काम सांगायचे. एका रात्री मी जेव्हा झोपलो होतो. त्यावेळी वॉकी टॉकीवरुन आवाज आला की ‘निरज लाईट बंद कर दो’. मी सुशांत सरांच्या बेडरुमजवळ गेलो तर सुशांत सर झोपलेले दिसले आणि लाईट्सही बंद होत्या. काही वेळानं पुन्हा तसाच आवाज आला. पुन्हा जाऊन पाहिलं तर लाईट बंदच होत्या. आणि सुशांत सरही झोपले होते. मी खूप घाबरलो, मला त्या रात्री झोपच आली नाही. बरं एवढंच नाही तर लिफ्टचा खालीवर जाण्याचा आवाजही येत होता आणि ड्रम वाजवल्यासारखाही आवाज कानावर पडत होता. त्यामुळं सुशांत सरांनी ते घरं सोडलं होतं, असंही निरजने सांगितले.

सुशांतचा कूक निरज सिंहने जे सांगितलं त्यावरुन सीबीआयचे अधिकारीही चकीत झाले आणि त्यामुळं निरजला आणखी प्रश्न करुन सुशांत संदर्भात एक एक बाब जाणून घेण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | सुशांतच्या फलॅटसंदर्भात मालक संजय लालवानींची चौकशी

Sushant Singh Case | सुशांत आत्महत्याप्रकरणात सीबीआयकडून सीन रिक्रिएट, सिद्धार्थ पिठाणी, नीरज आणि दीपेशची तीन तास चौकशी

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.