भिवंडीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार, नागरिकांचा रस्त्यावर उतरुन संताप
भिवंडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
भिवंडी : भिवंडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात रात्री उशिरा नागरिकांनी रस्त्यावर उतरुन संतापही व्यक्त केला (Bhiwandi Minor Girl Kidnapping And Rape Case).
भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाणे क्षेत्रातील एका चाळीत राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या कुटुंबियांच्या ताब्यातून फूस लावून अपहरण केल्याबाबत पीडितेच्या पालकांनी 12 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होतकी. अपहरण झालेली मुलगी ही अल्पवयीन असल्याने अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांच्या तीन पथकांनी पास सुरु करत पीडितेच्या पालकांकडे अधिक कसून चौकशी केली. त्यामध्ये सुशीलकुमार संतोष सोनी (वय 28) आणि इरशाद इलियास अन्सारी (वय 48) या दोन पानपट्टी चालक असलेल्या संशयितांची नावे समोर आली.
त्यानंतर पोलिसांनी या दोघांच्या मंगळवारी रात्री उशिरा या संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या दरम्यान, सुशीलकुमार संतोष सोनीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजले असता पोलिसांनी या आरोपींविरोधात भादंवी कलम 376 (जे) सह पोक्सो गुन्ह्यांतर्गत कलम 4, 8, 12 या वाढीव कलमांप्रमाणे गुन्हा दाखल केला.
दरम्यान, आरोपी पीडिता हे दोघेही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीची दिवनशाह दर्गा परिसरातील पानपट्टीची तोडफोड केली. त्यानंतर या आरोपींना निजामपुरा पोलीस ठाणे आणि तहसीलदार कार्यालय आवारात असलेल्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं.
या ठिकाणीही रात्री उशिरा नागरिकांनी आरोपींना आमच्या ताब्यात द्या यासाठी पोलिसांसोबत हुज्जत घालत गोंधळ घातला आहे. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शहरातील नागरिकांना या घटनेला कोणताही वेगळा धार्मिक रंग न देता शांतता राखण्याचे आवाहन केले.
वर्षभरात मुंबईतल्या गोवंडीतील 21 तरुणी गायब, किरीट सोमय्यांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी@KiritSomaiya https://t.co/JcnB9wCzdE
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2020
Bhiwandi Minor Girl Kidnapping And Rape Case
संबंधित बातम्या :
Hubali Shooting Case | हुबळी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक, महाराष्ट एटीएसची मोठी कारवाई