Tik-Tok च्या नादात बंदुकीतून गोळी झाडली, तरुणाचा जागीच मृत्यू

पब्जी (PUBG) गेमने तरुणांचा जीव घेतल्याच्या घटना घडत असतानाच आता टिक-टॉकनेही (TikTok) अशाच घटना घडत असल्याचे समोर येत आहे. शिर्डीत टिक-टॉक अॅपवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Tik-Tok च्या नादात बंदुकीतून गोळी झाडली, तरुणाचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 12, 2019 | 4:23 PM

अहमदनगर : पब्जी (PUBG) गेमने तरुणांचा जीव घेतल्याच्या घटना घडत असतानाच आता टिक-टॉकनेही (TikTok) अशाच घटना घडत असल्याचे समोर येत आहे. शिर्डीत टिक-टॉक अॅपवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात नातेवाईकाच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह आणखी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अन्य एक आरोपी फरार आहे.

शिर्डीतील हॉटेल पावनधाममधील रुम क्रमांक 104 मध्ये हा थरार घडला. या गोळीबारात प्रतिक वाडेकर या दहावीत शिकणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला. मृत प्रतिक वाडेकर त्याचा चुलत भाऊ नितीन वाडेकर आणि अन्य 5 जणांसह फ्रेश होण्यासाठी हॉटेलमध्ये आले. तेथे त्यांनी रुम भाड्याने घेतली. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडला.

मृत प्रतिक वाडेकर (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) हा बाहेरगावी शिक्षणासाठी होता. चुलत्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तो शिर्डीत आला होता. रुम भाड्याने घेतल्यानंतर 5 जण रुममध्ये गेले. त्यावेळी ते सोशल मीडियावरील टिक-टॉक अॅपवर व्हिडीओ बनवत होते. दरम्यान, त्यातील एकाच्या हातातील गावठी कट्ट्यातून गोळी सुटून ती प्रतिकच्या छातीत लागली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

घटनेनंतर चौघेही हॉटेलच्या रुममधून फरार झाले. हॉटेल मालकाने रुममध्ये प्रतिकला जखमी अवस्थेत बघितल्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. हॉटेल मालकाच्या तक्रारीवरुन आरोपींविरुध्द भारतीय दंड विधान कलम 302, 307, 34 सह आर्म अँक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक आरोपी अद्यापही फरार आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर हा प्रकार टिक-टॉक अॅपवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात घडल्याचे समोर आले.

टिक-टॉकसारख्या अॅपवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे व्हिडीओ बनवून अपलोड केले जातात. परंतु पिस्तुलचा वापर करुन टिक-टॉक व्हिडीओ बनवताना एकाचा जीव गेला आहे. शिर्डीसारख्या धार्मिक तिर्थस्थळी देशी कट्टे येतात कसे? हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे. शिर्डीत गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.