कचरा टाकण्यावरुन वाद, स्वच्छता मार्शल महिलेचा एका व्यक्तीवर टोकदार चावीने वार, डोंबिवलीत घटना

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचऱ्याचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहतो. याच कचऱ्यावरुन अनेकदा वाद झाले आहेत.

कचरा टाकण्यावरुन वाद, स्वच्छता मार्शल महिलेचा एका व्यक्तीवर टोकदार चावीने वार, डोंबिवलीत घटना
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 7:19 PM

डोंबिवली : कचऱ्याच्या वादातून स्वछता मार्शल महिलेने कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला (Dombivali Swachhta Marshal Woman) टोकदार चावीने पोटात वार करुन जखमी केल्याची घटना डोंबिवलीत घडली. या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली (Dombivali Swachhta Marshal Woman).

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचऱ्याचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहतो. याच कचऱ्यावरुन अनेकदा वाद झाले आहेत. कल्याण डोंबिवलीच्या घनकाचरा व्यवस्थापणाने शहराला 100 टक्के कचरा मुक्त करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. अनियमितता दाखवणाऱ्या ठरकेदाराला सव्वा कोटी रुपयांचे दंड देखील ठोठावला आहे.

महापालिकेचे एकच लक्ष आहे शहर स्वच्छ करणे. यासाठी खासगी मार्शलसुद्धा नेमले गेले आहेत. हे मार्शल रस्त्यावर थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवतात. या स्वच्छ मार्शलसोबत नागरिकांचे अनेकदा वाद देखील होतात. असाच एक वाद आज डोंबिवलीत झाला.

नेमकं काय घडलं?

डोंबिवलीतील आंबेडकर नगर परिसरात स्वच्छता मार्शल महिला उभ्या असताना विजय मोरे नावाच्या व्यक्तीने रस्त्यावर कचरा टाकला. या महिला मार्शलने विजयला हटकले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. महिला मार्शलचा आरोप आहे की विजय मोरे हा दारुच्या नशेर अंगावर धावून येत होता, म्हणून स्वरक्षणासाठी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या टोकदार चावीने हल्ला केला.

या घटनेत विजय मोरे हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात राम नगरपोलीस पुढील तपास करत आहेत.

Dombivali Swachhta Marshal Woman

संबंधित बातम्या :

पाणी पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवली, प्रवासी महिलेला बेशुद्ध करुन लुबाडलं, लुटारु रिक्षाचालकाला बेड्या

कारागृहाचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली 23 लाखांचा गंडा, दाम्पत्याविरोधात तक्रार

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.