“पोलिसांना सांग, मी दोघींना ठार मारलंय” पत्नी-आईच्या हत्येनंतर अ‍ॅथलिट इक्बाल सिंह यांचा मुलाला फोन

"मी तुमच्या आई आणि आजीला ठार मारले. पोलिसांना बोलावून मला घेऊन जायला सांग" असे कांस्यपदक विजेते माजी अ‍ॅथलिट इक्बाल सिंह यांनी हल्ल्यानंतर मुलाला फोनवर सांगितले.

पोलिसांना सांग, मी दोघींना ठार मारलंय पत्नी-आईच्या हत्येनंतर अ‍ॅथलिट इक्बाल सिंह यांचा मुलाला फोन
Follow us
| Updated on: Aug 26, 2020 | 1:40 PM

वॉशिंग्टन : आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताचे कांस्यपदक विजेते माजी अ‍ॅथलिट इक्बाल सिंह यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. त्यांनी पत्नी आणि आईची हत्या केल्याची कबुली दिल्याचे वृत्त स्थानिक मीडियाने दिले आहे. “मी तुमच्या आई आणि आजीला ठार मारले. पोलिसांना बोलावून मला घेऊन जायला सांग” असे त्यांनी हल्ल्यानंतर मुलाला फोनवर सांगितले होते. (Former India athlete Iqbal Singh kills wife and mother at his home in United States)

पेनसिल्व्हेनियामधील डेलावर काउंटी भागात राहणाऱ्या 62 वर्षीय इक्बाल सिंह यांनी रविवारी सकाळी पोलिसांना बोलावून आपला गुन्हा कबूल केला, असे ‘फिलाडेल्फिया इन्क्वायरर’ वृत्तपत्राने सांगितले.

पोलिस जेव्हा न्यूटाऊन टाऊनशिपमध्ये असलेल्या सिंह यांच्या घरी पोहोचले, तेव्हा ते रक्ताने माखलेले आढळले. त्यांनी स्वत:ला भोसकल्याने जखमा झाल्याचे बोलले जाते. तर आत दोघी जणींचे मृतदेह होते, असे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. कोर्टात सोमवारी सिंह यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला. गुन्ह्याचे स्वरुप पाहता कोर्टाने त्यांना जामीन नाकारुन पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा : गर्लफ्रेंड रिक्षाचालकासोबत पळाली, पठ्ठ्याने पुण्यात ‘असा’ राग काढला!

रॉकवुड रोडवरील घराच्या पहिल्या मजल्यावर पोलिसांना सिंह यांच्या आई नसीब कौर सापडल्या. त्यांचा गळा चिरण्यात आला होता. तर सिंह यांची पत्नी जसपाल कौरही वरच्या मजल्यावर आढळली होती. सासू-सुनेला घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले, मात्र हत्येचा हेतू अस्पष्ट आहे.

“मी त्या दोघींना ठार मारले आहे. मी तुमच्या आई आणि आजीला ठार मारले. पोलिसांना बोलावून मला घेऊन जायला सांग” असे त्यांनी हल्ल्यानंतर मुलाला फोनवर सांगितले. त्याच वेळी त्यांनी मुलासोबत असलेल्या आपल्या मुलीलाही हेच सांगितले.

शॉट पुटर इक्बाल सिंह यांनी कुवेत येथे झालेल्या 1983 च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अमेरिकेत जाण्यापूर्वी ही त्यांच्या क्रीडा कारकीर्दीतील सर्वात मोठी कामगिरी राहिली. ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते, अशी माहिती अमेरिकन मीडियाने दिली आहे.

(Former India athlete Iqbal Singh kills wife and mother at his home in United States)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.