बस प्रवासात ओळख, खाऊ देण्याचा बहाणा, नगरच्या महिलेचे चार महिन्यांचे बाळ पुण्यात पळवले

खाऊ आणण्याचा बहाण्याने बाळाला फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही.

बस प्रवासात ओळख, खाऊ देण्याचा बहाणा, नगरच्या महिलेचे चार महिन्यांचे बाळ पुण्यात पळवले
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 5:25 PM

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून चार महिन्याच्या बाळाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस प्रवासात झालेल्या ओळखीचा फायदा घेत आरोपी महिलेने 23 वर्षीय तरुणीच्या बाळाचे अपहरण केले. (Four months old baby kidnap in Hadapsar Pune)

अहमदनगर-सातारा महामार्गावरुन तक्रादार आणि आरोपी या दोन्ही महिला बसने प्रवास करुन आल्या. दोघींची बसमध्येच ओळख झाली. तक्रारदार तरुणीसोबत तिचे चार महिन्यांचे तान्हे बाळही होते. पुण्यात स्वारगेट बसस्थानक दोघीही उतरल्या आणि हडपसरला निघाल्या.

प्रवासात झालेल्या ओळखीनंतर आरोपी महिलेने विश्वास संपादन करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. बाळाला घेऊन खायला आणण्यासाठी निघून गेली ती परत आलीच नाही. बाळाच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे. बाळाचा शोध घेण्यासाठी हडपसर पोलिसांनी पथकंही तैनात केली आहेत.

नेमकं काय घडलं?

फिर्यादी तरुणीचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन तिने चार महिन्याच्या बाळाला घेऊन घर सोडले. लोणी गावात राहणारी महिला अहमदनगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास सुरु केला. त्याचवेळी एक महिला त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली.

काही वेळाने आरोपी महिलेने तक्रारदार तरुणीशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर या दोघीही हडपसर परिसरात आल्या. तेथील एका चायनीजच्या दुकानात दोघींनी जेवण केले.

त्यानंतर आरोपी महिलेने खाऊ आणण्याचा बहाण्याने बाळाला फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही. बराच वेळ झाल्यानंतर फिर्यादी महिलेने आजूबाजूच्या परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरु केला. अद्याप तिचा शोध लागला नसून, पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत. (Four months old baby kidnap in Hadapsar Pune)

संबंधित बातम्या :

फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील बाळाची चोरी; अवघ्या चार तासात चौघांना अटक

चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडणारी पुण्याची पाषाणहृदयी आई अटकेत

(Four months old baby kidnap in Hadapsar Pune)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.