अहमदनगरमध्ये विहिरीत उडी मारुन पतीची आत्महत्या, पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू

अहमदनगरमध्ये पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली (Husband and Wife death in Ahmednagar) आहे.

अहमदनगरमध्ये विहिरीत उडी मारुन पतीची आत्महत्या, पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 28, 2020 | 7:18 PM

अहमदनगर : अहमदनगरमध्ये पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली (Husband and Wife death in Ahmednagar) आहे. किरकोळ भांडणाच्या रागातून विहिरीत उडी मारलेल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीनेही उडी घेतली. मात्र यात दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली (Husband and Wife death in Ahmednagar) आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेलवाडी येथील रहिवाशी ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर वय-३० वर्ष आणि पत्नी कविता खोतकर वय-25 या दोघांचे शनिवारी (27 जून) रात्री 11 वाजता किरकोळ कारणातून भांडण झाले.

यानंतर संतापलेल्या ज्ञानेश्वरने थेट शेतातील विहीरीकडे धाव घेतली आणी स्वतःला विहीरीत झोकून दिले. पतीला वाचवण्यासाठी पत्नीनेही मागोमाग विहीरीत उडी घेतली.

दोघेजण विहीरीत पडल्याचं बघून ज्ञानेश्वरच्या बहिणीने आरडाओरडा करत गावकऱ्यांना हाका मारल्या आणि तीनेही भावाला आणी वहिनीला वाचवण्यासाठी विहीरीत उडी मारली. गावकऱ्यांनी टाकलेला दोर पकडल्याने बहिणीचा जीव वाचला. मात्र पती-पत्नी खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील रेलवाडी या ठिकाणी मयत ज्ञानेश्वर खोतकर हा आपल्या आई, वडील, बहीण, दोन वर्षाची मुलगी यांच्यासोबत राहत होता. वडील शेळी पालन करून या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होते. तर मयत हा मजुरी करत होता. मयताचे साधारण चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

जिवंतपणी वेगळे मात्र एकत्र मरण, पती-पत्नीची अनोखी कहाणी

घरात स्टोव्हने पेट घेतल्याने पती-पत्नीसह दोन वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.