“मुलाची चूक असेल तर गोळी मारा”, हाथरस प्रकरणाताील आरोपींच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाला आहे (Hathras rape case). या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुलाची चूक असेल तर गोळी मारा, हाथरस प्रकरणाताील आरोपींच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 2:58 PM

लखनऊ (उत्तर प्रदेश) : हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाला आहे (Hathras rape case). या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हाथरस प्रकरणावर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान आता आरोपींच्या कुटुंबियांनी या प्रकरणावर आपली मतं मांडली आहेत (Hathras rape case).

आरोपींच्या एका कुटुंबियांनी म्हटले की, “माझ्या मुलाची चूक असेल तर गोळी मारा”. तर दुसऱ्या आरोपीच्या कुटुबियांनी म्हटले, “पीडितेच्या कुटुंबियांनीच आपल्या मुलीला मारले”.

हाथरस बलात्कार प्रकरणात चार आरोपी आहेत. संदीप, लवकुश, रवी आणि राजकुमार अशी आरोपींची नावं आहेत. आम्ही चारही आरोपींच्या कुटुंबियांसोबत बोललो आणि जाणून घेतेले की, त्यांच्या मुलांवर करण्यात आलेल्या आरोपांवर त्यांचे काय मत आहे.

“घटनेच्या दिवशी माझा मुलगा माझ्या सोबत होता. त्याचे नाव या प्रकरणात लिहिलं हे चुकीचं आहे”, असं आरोपी संदीपचे वडील गुड्डू यांनी सांगितले. संदीपच्या आईनेही हेच सांगितलं आहे.

पीडितेच्या कुटुंबियांनी स्वत:च आपल्या मुलीला मारले

“घटनेच्या दिवशी माझा मुलगा लवकुश शेतात माझ्यासोबत काम करत होता. पीडितेच्या कुटुंबियांनी स्वत:च आपल्या मुलीला मारले. मी पाहिले मुलगी पडलेली होती आणि तिची आई शेतात काम करायला जात होती. तिला काही फरक पडत नव्हता. माझ्या मुलाने तर पीडितेला पाणी पाजलं”, असं आरोपी लवकुशची आई मुन्नीने सांगितले.

माझ्या मुलाची चूक असेल तर गोळी मारा

“माझा मुलगा घटनेच्या वेळी माझ्यासोबत घरी होता. जर त्याची चूक असेल तर त्याला गोळी मारा, जर मी खोटं बोलत असेल तर मला गोळी मारा”, असं आरोप रवीचे वडील अतर सिंह यांनी सांगितले.

“पीडितेच्या कुटुंबियांसोबत आमची जुनी दुश्मनी आहे. घटनेच्या दिवशी माझा मुलगा तर गावाच्या बाहेर नोकरीवर होता. माझ्या मुलाचे नाव 12 दिवसांनी पूर्व नियोजित करुन या प्रकरणात घालण्यात आले”, असं चौथा आरोपी राजकुमारचे वडील राकेश यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

धक्कादायक ! देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल

Hathras Gang Rape | राहुल गांधींसह प्रियंका गांधी हाथरसकडे रवाना, पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.