हिंगणघाट जळीतकांड : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी, उज्ज्वल निकमांचंही काम सुरु : गृहमंत्री

हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. शिवाय पीडित तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्याची ग्वाहीही यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.

हिंगणघाट जळीतकांड : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी, उज्ज्वल निकमांचंही काम सुरु : गृहमंत्री
Follow us
| Updated on: Feb 10, 2020 | 10:27 AM

मुंबई: हिंगणघाटमध्ये जळीतकांडात जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी(Hinganghat Burn Victim Teacher Death)  ठरली. आज सकाळी पीडित तरुणीचा (Hinganghat Burn Victim Teacher Death) मृत्यू झाला. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. शिवाय पीडित तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्याची ग्वाहीही यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.

याबाबत गृहमंत्री म्हणाले, “वर्ध्यातील पीडित मुलीला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण ती वाचू शकली नाही याचं दु:ख आहे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  उज्ज्वल निकम हे संबंधित घटनेबाबत पोलिसांच्या संपर्कात आहेत. कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर व्हावी ही राज्य सरकारची भूमिका आहे”.

याशिवाय अनिल देशमुख यांनी पीडित तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देणार असल्याची माहितीही यावेळी दिली.

हिंगणघाट येथील पीडित प्राध्यापिकेचं निधन ही अतिशय दु:खद घटना आहे. आमच्या परीने तिला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पीडीत तरुणीला वाचवू शकलो नाही याचं दु:ख आहे.  आज सकाळीच पीडितेच्या वडिलांशी बोललो, त्यांच्या घरातील मुलीच्या भावाला सरकारी नोकरी देणार आहोत. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी उज्ज्वल निकम कामाला लागले आहेत.  सकाळपासून उज्ज्वल निकम, जिल्हा पोलीस प्रमुखांशी बोललो. एक-दोन दिवसांत त्यांची बैठक आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील 24 वर्षीय पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू (Hinganghat Burn Victim Teacher Death) झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने पहाटे तरुणीची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज सकाळी (10 फेब्रुवारी) सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राजकीय नेते पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत आहेत (Hinganghat Teacher Death).

पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल संपूर्ण रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. संसर्गामुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. ‘सेप्टीसेमिक शॉक’ असं तिच्या मृत्यूचं वैद्यकीय परिभाषेतील कारण डॉक्टरांनी सांगितलं.

..तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, वडिलांची प्रतिक्रिया 

आमच्या मुलीने सहन केलं, मात्र आरोपीची अवस्थाही तिच्याप्रमाणे करा, तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया हिंगणघाट जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या पीडित शिक्षिकेच्या वडिलांनी (Hinganghat Burnt Victim Father Reaction) केली. राज्य सरकारचे प्रतिनिधी येईपर्यंत पीडितेचं पार्थिव हाती न घेण्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.

आरोपीला 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

पीडितेला जाळणारा आरोपी विकी नगराळेला 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. घटनेनंतर नागरिकांमधील संताप लक्षात घेत न्यायालयाने शुक्रवारी रात्री 12.25 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. त्यानंतर आरोपीला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

काय आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरण?

24 वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. तिचा चेहरा जळाल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या.

संबंधित बातम्या 

आरोपीला लोकांमध्ये सोडा, तरच मुलीच्या आत्म्याला शांती, हिंगणघाट पीडितेच्या वडिलांचा आकांत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.