चोराचं धाडस बघा ! चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन करायचा चोरी; पोलीसही अवाक

मुंबईतील दिंडोशी येथे कोरोना रुग्णालयात जाऊन चोरी करणाऱ्या एका चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. | Robbery in Corona hospital

चोराचं धाडस बघा ! चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन करायचा चोरी; पोलीसही अवाक
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 5:38 PM

मुंबई : मुंबई उपनगरातील दिंडोशी (Dindoshi) येथे चोरीचा एक अजब प्रकार घडला आहे. चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन चोरी करणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा चोर कोरोना रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांना लुटायचा. त्यांच्या बॅगमधून पैसे आणि मोबाईल चोरायचा. या अट्टल चोराचं नाव आसिफ इंद्रिस पठाण असून त्याच्या अजब धाडसामुळे पोलीसही अवाक झाले आहेत. आरोपी आसिफला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 12 च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सध्या त्याला दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.  (Dindoshi thief used to go to the Corona hospital and rob relatives.)

कोरोना संसर्गाला नागरिक अजूनही घाबरतात. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात यायचं टाळतात. असं असतानाही आसिफ हा चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन चोरी करायचा. आसिफ इंद्रिस पठाण हा कोरोना रुग्णांना भेटायला, रुग्णांचा काळजी घ्यायला आलेल्या नातेवाईकांना लुटायचा. रुग्णालयात रात्री जाऊन झोपलेल्या नातेवाईकांचे पैसे, बॅग, मोबाईल चोरी करायचा.

दिंडोशी पोलीस ठाण्यात 5 ऑक्टोबरला कोरोना रुग्णालायातून चोरी झाल्याचा पहिला गुन्हा नोंद झाला. तक्रारदाराचे वडील आजारी असल्याने त्यांना दिंडोशीतील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांना कधी तातडीची मदत लागते, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबण्याची मुभा आहे. हे नातवाईक रात्री रुग्णालयाच्या आवारातच झोपतात. याच गोष्टीचा फायदा उचलत आसिफ रुग्णांच्या नातेवाईकांचे पैसे, बॅग, मोबाईल चोरायचा. त्याची चोरी करायची पद्धतही अजब होती. त्याच्या चोरीची पद्धत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आसिफच्या चोरीचे व्हिडिओ धक्कादायक आहेत.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुसक्या आवळल्या

आसिफच्या चोऱ्यांमुळे रुग्णालय प्रशासन आणि कोरोना रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले होते. त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दिंडोशी पोलीस तसेच  मुंबई गुन्हे शाखेचे युनिट 12 चे अधिकारी या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. मुंबई गुन्हे शाखेचे युनिट 12 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोऱ्यांचा छडा लावण्यात आला. त्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड, पोलीस नाईक अमोल राणे यांनी तपास सुरू केला. तपास करण्यासाठी त्यांनी रुग्णालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासायला सुरुवात केली. त्यात त्यांना रुग्णालयाच्या आवारातून एका रिक्षाने आरोपी पळून गेल्याचं कळलं. त्यावरुन पोलिसांना आरोपी आसिफचा सुगावा लागला. गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी सुमारे 100 पेक्षाही जास्त सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला. अखेर अंधेरी परिसरातून आसिफ इंद्रिस पठाणला मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, आसिफ इंद्रिस हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्याच्याकडून आतापर्यंत दोन रिक्षा आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्याची चौकशी सुरु असून आणखी काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता दिंडोशी पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

कल्याण-डोंबिवलीत केटीएम बाईकच्या सहाय्याने चोरी, चोरट्याला अटक

15 दिवसांपूर्वी दुचाकी लंपास, चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर पोस्ट, पोलिसांकडून चोरट्याला अटक

मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी, वसई पोलिसांकडून आरोपीला अवघ्या 4 तासात अटक

(in Dindoshi thief used to go to the Corona hospital and rob relatives.)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.