Jalgaon Murder | अडीच लाखांची सुपारी, मुक्ताईनगरमधील माजी सभापती हत्या प्रकरणाचा 72 तासात छडा

बुधवार 17 जूनला पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास डी ओ पाटील यांची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली होती. (Jalgaon Muktainagar Panchayat Samiti Ex Chairman D O Patil Murder Mystery Solved)

Jalgaon Murder | अडीच लाखांची सुपारी, मुक्ताईनगरमधील माजी सभापती हत्या प्रकरणाचा 72 तासात छडा
Follow us
| Updated on: Jun 21, 2020 | 12:35 PM

जळगाव : मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी ओ पाटील यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना 72 तासात यश आले आहे. अडीच लाख रुपयांची सुपारी देऊन पाटील यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. बुधवारी मध्यरात्री पेट्रोलपंप परिसरात पाटील यांची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. (Jalgaon Muktainagar Panchayat Samiti Ex Chairman D O Patil Murder Mystery Solved)

डी ओ पाटील हत्या प्रकरणातील आरोपी जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडाचे आहेत. पोलिसांनी काल (शनिवारी) रात्री तीन आरोपींना अटक केली. अडीच लाख रुपयांच्या मोबदल्यात माजी सभापती डी ओ पाटील यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

हेही वाचा : Jalgaon Murder | मुक्ताईनगरमध्ये माजी सभापतींची गळा चिरुन हत्या

बुधवार 17 जूनला पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास डी ओ पाटील यांची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली होती. बुधवारी सकाळी हत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. हत्येनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांसमोर या घटनेमुळे मोठे आव्हान उभे होते. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा तळ ठोकून होती.

कोण होते डी. ओ. पाटील?

डी. ओ. पाटील हे राजकीय क्षेत्रातील अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व होते. मुक्ताईनगर पंचायत समितीचे ते माजी सभापती होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

नेमकं काय झालं?

कुऱ्हा येथील गोसावी पेट्रोल पंप परिसरामध्ये डी. ओ. पाटील यांची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली होती. डी. ओ. पाटील अनेकदा शेतीच्या कामानिमित्त रात्री-अपरात्री डिझेल भरण्यासाठी जात असत. काहीवेळा ते पेट्रोल पंपावरच रात्री झोपत असत. याची माहिती असलेल्या व्यक्तीने नियोजनबद्ध हत्या केली असावी, असा अंदाज बांधला जात होता.

(Jalgaon Muktainagar Panchayat Samiti Ex Chairman D O Patil Murder Mystery Solved)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.